प्रशासन

RPF : यशस्वी भवचे मूर्त उदाहरण

Nagpur : प्रवाशांचे रक्षक बनले आरपीएफ

Author

नागपूर रेल्वे सुरक्षा बलाने 2024–25 आर्थिक वर्षात विविध सुरक्षा मोहिमांद्वारे उल्लेखनीय कामगिरी केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफने अनेक गुन्हे उघडकीस आणून महत्वाचे पाऊल उचलले.

रेल्वे सुरक्षा बल (RPF) नागपूर विभागाने 2024–25 आर्थिक वर्षात सुरक्षा, संरक्षण आणि प्रवाशांच्या सेवेसाठी उल्लेखनीय कार्यगौरव नोंदवले आहे. प्रवाशांच्या जीवित, संपत्ती आणि हक्कांसाठी झटणाऱ्या या यंत्रणेने विविध विशेष मोहिमांच्या माध्यमातून आपली कर्तव्यपरायणता सिद्ध केली आहे. नागपूर विभागातील आरपीएफ जवान केवळ कायदा आणि सुव्यवस्थेसाठीच नव्हे, तर समाजहितासाठीही झटत आहेत. प्रवाशांचा जीव वाचवण्यापासून ते मानवी तस्करी, अमली पदार्थ, बेकायदेशीर मद्य, दलालीविरोधी कारवायांपर्यंत त्यांनी बहुआयामी यश प्राप्त केले आहे.

ऑपरेशन जीवन रक्षक अंतर्गत आरपीएफने 7 प्रवाशांचे प्राण वाचवले. तर ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत हरवलेली 207 मुले (120 मुले, 87 मुली) शोधून काढली आणि सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली. हे कार्य बालसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. ऑपरेशन AAHT अंतर्गत दोन मानवी तस्करी प्रकरणांत 9 बालकांची सुटका करण्यात आली आणि 6 आरोपींना अटक करण्यात आली. ऑपरेशन नार्कोस अंतर्गत 444.156 किलो गांजाची (मूल्य 64.52 लाख) जप्ती करण्यात आली असून 11 आरोपी गजाआड झाले.

Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप

सामाजिक संवेदनशीलता

ऑपरेशन सतर्क अंतर्गत 64 प्रकरणांत 9 हजार 857 बाटल्या अवैध मद्य (मूल्य 12.40 लाख) जप्त करण्यात आल्या. तर 36 आरोपींना अटक झाली. ऑपरेशन उपलब्ध अंतर्गत 1 हजार 251 बनावट रेल्वे तिकिटे (मूल्य 31.46 लाख) जप्त करण्यात आली असून 88 दलालांवर कारवाई झाली. ऑपरेशन अमानतद्वारे 464 हरवलेली सामान (एकूण मूल्य 94.10 लाख) प्रवाशांना परत देण्यात आले.

ऑपरेशन डिग्निटी अंतर्गत 51 निराधार व्यक्तींना मदत करण्यात आली. तर ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत एका गर्भवती महिलेस योग्यवेळी मदत करण्यात आली. प्रवाशांच्या मालमत्तेच्या चोरीच्या 96 प्रकरणांत 113 आरोपींना अटक करण्यात आली, ज्यातून आरपीएफच्या सतर्कतेचा प्रत्यय दिसून येतो.

Nagpur : रेल्वेगाड्या धावणार आता अधिक विश्वासाने

नागपूर विभागातील आरपीएफने यशस्वी भव या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत 2024–25 मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. हा अहवाल त्यांच्या कार्यक्षमतेचा आरसाच ठरतो. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि माणुसकीने भरलेला करण्यासाठी आरपीएफ नागपूर विभाग कटिबद्ध आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!