नागपूर जीआरपीने आंध्रप्रदेश एक्सप्रेसमधील मोठ्या चोरीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत एसी कोचमधला आरोपी पकडला आहे. या कारवाईत 15 वर्षांपासूनच्या अनेक चोरींचा उलगडा झाल्याचे समोर आले आहे.
नागपूर विभागीय सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) यांनी आंध्रप्रदेश एक्सप्रेस गाडी क्र. 20806 मधील एका चोरट्याच्या ‘हायप्रोफाइल’ चोरीच्या नाटकाचा भन्नाट पर्दाफाश केला आहे. २ सप्टेंबरला मुलताई स्थानकाजवळ ए/1 कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या बायकोची पर्स हवेत गायब झाली. त्यातून 53 हजारचा माल गायब. ही बातमी ऐकताच नागपूर जीआरपीने ‘मिशन इम्पॉसिबल’ स्टाईलने तपासाची गाडी धावायला लावली. ही घटना आमला जीआरपीच्या हद्दीत येत असल्याने, तक्रार तिथे सरकवली गेली, पण नागपूर जीआरपीने आपली जादू दाखवत या चोराला ट्रॅकवर आणलं.
तक्रारीत कळलं की, चोराने 21 हजारच्या मौल्यवान वस्तू आणि 32 हजार रोख रक्कम अशी एकूण 53 हजारची चोरी केली होती. पण नागपूर जीआरपीच्या सुपर कॉप्सनी हार कशी मानायची? वरिष्ठ डीएसपी यांनी आयपीएफ/सीआयडी आणि आयपीएफ आमला यांना एकत्र करून ‘चोर पकडो’ पथक बनवलं. गुप्तचर माहिती आणि प्रवासाच्या ‘टिकटाचं गणित’ लावत या चोरट्याला शोधून काढलं. आणि मग, काय सीन झाला? चोराला ‘कॅच’ करायला जीआरपीने थेट दूरंतो एक्सप्रेस गाडी क्र. 12214 मध्ये धडक दिली.
Harshwardhan Sapkal : शेतकरी रडतो अन् सरकार बघ्याची भूमिका घेतं
नेटवर्कचा खुलासा
वीरांगना लक्ष्मीबाई झाशी स्थानकावर 8 सप्टेंबरला, चोर आपल्या नेहमीच्या ‘एसी कोच’ स्टाईलने मस्त प्रवास करत होता, पण त्याला काय माहीत जीआरपी त्याच्या मागावर आहे. संयुक्त पथकाने त्याला पकडलं आणि चौकशीत त्याने फक्त आंध्रप्रदेश एक्सप्रेसचीच नव्हे, तर गेल्या 15 वर्षांपासूनच्या चोरीच्या कारनाम्यांचा अल्बम उघडला. हा चोर तर रेल्वेच्या एसी कोचमधला ‘सुपरस्टार’ निघाला, पण आता त्याचा ‘शो’ बंद. आरोपीला आमला जीआरपीकडे सुपूर्द करताना, त्याच्या गुन्हेगारी नेटवर्कचा तपास सुरू झाला आहे. हा चोर इतर रेल्वे विभागांशी जोडला गेलाय की नाही, याचा शोध घेतला जाणार आहे.
नागपूर आणि आमला जीआरपीच्या या स्पाय मूव्हीसारख्या कारवाईने प्रवाशांचं टेन्शन हलकं झालं. नागपूर जीआरपीने या जलद कारवाईने चोरांना एसीतून स्लीपर क्लासपर्यंत आणलं. या चोराच्या कबुलीमुळे इतर अनेक चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रवासी आता रिलॅक्स होऊन प्रवास करू शकतील. ही भन्नाट कारवाई जीआरपीच्या सतर्कता दाखवते. ज्यामुळे रेल्वे मार्गावरील चोरांचा खेळ खल्लास झाला आहे.