महाराष्ट्र

Marbat Festival : नागपूरात ट्रम्पपासून पहलगामपर्यंत, बडग्यांचा सामाजिक प्रहार

Nagpur : परंपरेचा वारसा, व्यंगाचा रंग आणि जनजागृतीची जादू

Post View : 69

Author

नागपूरचा मारबत महोत्सव यंदा केवळ पारंपरिक उत्सव नाही तर महागाई, दहशतवाद, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारा व्यंगात्मक कार्यक्रम ठरणार आहे.

देशाच्या हृदयस्थानी वसलेले नागपूर शहर, ज्याला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण करत आले आहे. नागपूरची भाषा, त्याची संस्कृती, येथील लोकांची सजीवता आणि शहरातील उत्सवांची वैविध्यपूर्णता हीच शहराची खरी खासियत आहे. या शहराचे उत्सव इतके अनोखे आहेत की ते केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारताच्या इतर भागातही आपले स्वरूप दर्शवतात. 2025 हे वर्ष भारतासाठी अनेक कारणांनी कठीण राहिले. जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ला, अमेरिका-भारत करविषयक संघर्ष या सर्व घडामोडींचा प्रभाव नागपूरकरांवरही जाणवला. त्यातच नागपूरमध्ये सध्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

बैलपोळ्याच्याच निमित्ताने नागपूरमध्ये एक विशेष आणि ऐतिहासिक उत्सव सुरू झाला आहे. तो म्हणजे मारबत महोत्सव. हा उत्सव गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे. मात्र यंदा त्याची चमक काहीशी वेगळीच दिसणार आहे. शहरातील मारबत उत्सव यंदा केवळ पारंपरिक रंगात नाही, तर सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत गाजणार आहे. शनिवारी (23 ऑगस्ट 2025) साजरा होणाऱ्या या महोत्सवात शहरातील विविध मंडळे महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता अशा गंभीर प्रश्नांवर जनजागृती करणारे बडगे उभारणार आहेत. यंदा महोत्सवात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतीकात्मक पुतळा देखील उभारला जाणार आहे. यामागचे कारण म्हणजे जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ला आणि अमेरिकेच्या भारतावर लादलेल्या कर धोरणाविरुद्ध नागरिकांचा व्यंगात्मक संदेश.

Sandip Joshi : सायकलच्या पेडल सोबत वेगाने धावू लागली मुलांची स्वप्ने

लोकसहभागाचा जिवंत उत्सव

नेहरू पुतळा चौक, कोतवाली चौक, गांधी पुतळा चौक, व्हीटी पार्क आणि अमरावती रोडसह शहरभर विविध ठिकाणी बडगे मिरवली जातील. जे नागरिकांना प्रशासन आणि सरकारला थेट संदेश देणारे ठरणार आहेत.मारबत महोत्सव हा फक्त धार्मिक सण नाही, तर सामाजिक व्यंग आणि जनजागृतीचा एक महत्त्वाचा मंच आहे. ‘इडा-पीडा घेऊन जा रे मारबत’ अशा घोषणांमधून लोक आपले दु:ख, समस्या आणि असंतोष व्यक्त करतात. यंदा महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचे दुःख, स्मार्ट मीटरमुळे वाढलेले वीजबिल, तसेच व्यसनाधीनतेच्या समस्यांवर जनजागृती करण्याचे काम या महोत्सवाद्वारे केले जाणार आहे. शहरातील तरुण कार्यकर्त्यांच्या मंडळांनी महागाई, वाढते वीजबिल, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता या समस्यांवर लक्ष वेधून सामाजिक संदेश देण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे नागपूरकरांना हा उत्सव केवळ मनोरंजनासाठी नाही तर विचार करण्यासाठीही प्रेरणा देतो.

मारबत उत्सवाचा इतिहासही अत्यंत रुचकर आहे. इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळलेल्या नागपूरकरांनी 1885 मध्ये पिवळी मारबत उत्सव समिती स्थापन केली होती. हा उत्सव केवळ धार्मिक नव्हता, तर इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध जनजागृतीचा माध्यम होता. आजही मारबत महोत्सव केवळ परंपरेतून नाही तर सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातून साजरा केला जातो. ट्रम्पपासून व्यसनाधीनता पर्यंत, महागाईपासून स्मार्ट मीटरपर्यंत, यंदा उत्सवात विविध बडगे नागपूरकरांना विचार करण्यास प्रवृत्त करतील.नागपूरचा मारबत उत्सव म्हणजे फक्त रंगीत पुतळे आणि मिरवणूक नाही, तर लोकसहभाग, सामाजिक व्यंग आणि जनजागृती यांचा जिवंत संगम आहे. प्रत्येक वर्षीच्या उत्सवास नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. यंदाही हा उत्सव नागपूरकरांच्या मनावर अमिट ठसा उमटवणार आहे.

Vice Presidential Election : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः उतरतील का रणभूमीवर?

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!