महाराष्ट्र

Nagpur : मेट्रोच्या विस्ताराने शहराला मिळणार गतिमान जीवनशैली

Maha Metro : ऑरेंज लाईन विस्ताराने नागपूरची कनेक्टिव्हीटी आणखी भक्कम

Post View : 47

Author

नागपूर मेट्रोच्या टप्पा-II विस्ताराने शहराच्या विकास प्रवासात नवा टप्पा सुरू केला आहे. ऑरेंज लाईनवरील पहिल्या स्पॅनच्या लाँचिंगने नागपूरच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांती घडविण्याचा मार्ग अधिक वेगाने खुला झाला आहे.

नागपूर शहरातील मेट्रो प्रकल्पाने विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाची झेप घेतली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नागपूर मेट्रोच्या टप्पा-II विस्तारातील कामकाजाला गती मिळाली आहे. या प्रकल्पात एक नवा टप्पा पार पडला आहे. शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडविणाऱ्या या उपक्रमाने नागपूरच्या नागरी जीवनाला नवे आयाम देण्याची सुरुवात केली आहे.

या प्रगतीशील टप्प्यातील शुभारंभ प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक (प्रकल्प) राजीव त्यागी, कार्यकारी संचालक अरुण कुमार, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक विद्यसागर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूरकरांसाठी मेट्रो सुविधा अधिक सक्षम, सोयीस्कर आणि भविष्याभिमुख करण्याचा दृढ निश्चय या उपस्थितीतून प्रकट झाला.

Pratibha Dhanorkar. : जय महाराष्ट्रच्या घोषणेसह काँग्रेस खासदारांचा दीर भाजपमध्ये 

नागपूरच्या उत्तरेतील जीवनरेखा

टप्पा-II मधील रीच-2B या मार्गाची एकूण लांबी 6.016 किमी असून लेखा नगर (आशा हॉस्पिटल) ते कन्हान नदी मेट्रो स्टेशनपर्यंत हा विस्तार होणार आहे. नागपूरच्या उत्तरेकडील कँटोन्मेंट परिसर, शाळा, हॉस्पिटल्स, बसस्थानके अशा दैनंदिन प्रवाशांसाठी महत्त्वाच्या ठिकाणांना थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांना वेळेची बचत आणि प्रवासातील सोयीची खात्री मिळेल. ऑरेंज लाईनचा हा विस्तार एकूण 12 किमी लांबीच्या मार्गाचा घटक असून ऑटोमोटिव चौक ते साई मंदिर (कन्हान नदी) या भागातील प्रवासाला गती देईल. नागपूरच्या उत्तर-दक्षिण दिशेतील जोडणी आणखी मजबुत होईल.

नागपूर मेट्रोच्या विस्तारात रीच-2 या कॉरिडॉरला दोन विभागांमध्ये विभागण्यात आले आहे. रीच-2A मध्ये पिली नदी, खसरा फाटा, ऑल इंडिया रेडिओ, खैरी फाटा, लोकविहार आणि लेखा नगर स्थानके येतात, तर रीच-2B मध्ये कँटोन्मेंट, कामठी पोलीस स्टेशन, कामठी नगर परिषद, ड्रॅगन पॅलेस, गोल्फ क्लब आणि कन्हान नदी स्थानके समाविष्ट आहेत. या विभागणीमुळे नागपूर शहरातील व्यापारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्रांना मेट्रोशी थेट जोडणी मिळणार आहे.

IPS Archit Chandak : एसपी खाकीचा रौब दाखवतात तेव्हा..

तांत्रिक टप्प्याचे लाँचिंग

टप्प्यातील पहिल्या स्पॅनची लांबी 25 मीटर असून त्यात 9 सेगमेंट्सचा समावेश आहे. या सेगमेंट्सची उभारणी ‘सह्याद्री’ नावाच्या अत्याधुनिक लॉन्चिंग गर्डरच्या सहाय्याने करण्यात आली. या तांत्रिक टप्प्याचे यशस्वी लाँचिंग हे संपूर्ण फेज-II प्रकल्पाच्या वेळेत पूर्णत्वाकडे नेणारे महत्त्वाचे पाऊल आहे. महामेट्रोने 24 महिन्यांत रीच-2B चे काम पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. काम नियोजित वेळेत पार पडल्यास नागपूर शहराच्या सार्वजनिक वाहतुकीत एक नवीन पर्व सुरू होणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!