प्रशासन

Nagpur : डिजिटल साक्षरतेच्या दिशेने विंग्स फ्लाय हाय बसचा धावता ध्यास

Digital Education : नागपूरच्या शाळांमध्ये संगणक शिक्षणाचा नवीन अध्याय

Author

विंग्स फ्लाय हाय उपक्रमाअंतर्गत नागपूर महापालिकेने मोबाइल संगणक लॅब सुरू केली आहे. या बसद्वारे शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत संगणक शिक्षण दिलं जात आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याची घडी मजबूत करण्याच्या उद्देशाने मनपाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. विंग्स फ्लाय हाय मोबाइल संगणक शिक्षण बस लॅब हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या दारात संगणक शिक्षण घेऊन पोहोचत आहे. संगणकाशी जवळीक निर्माण करणारा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्याची बीजं पेरणार आहे.

उपक्रमाचा शुभारंभ पारडी मराठी उच्च प्राथमिक शाळेत करण्यात आला. महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला नगर शिक्षण अधिकारी साधना सायम, एल्केम साउथ आशिया प्लांट प्रमुख कुमार किनले, वरिष्ठ व्यवस्थापक संजय बेडेकर. सह्याद्री फाउंडेशनचे संचालक देवेंद्र क्षीरसागर, विंग्स फ्लाय हाय प्रकल्पाचे व्यवस्थापक नितेश नागदेवे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Justice Bhushan Gavai : 22 वर्षांची सेवायात्रा न्यायासाठी

सीएसआरद्वारे तंत्रज्ञानाची साथ

उपक्रम एल्केम साउथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड व सह्याद्री फाउंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त पुढाकारातून सीएसआर निधीच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. विंग्स फ्लाय हाय या नावाने ओळखली जाणारी ही संगणक लॅब बस, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संगणक शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे. या अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळांमधील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे.

मोबाइल संगणक बसमध्ये आवश्यक सर्व डिजिटल साधनं, शैक्षणिक सॉफ्टवेअर्स, प्रशिक्षित शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या अनुभवात्मक शिक्षणासाठी विशेष उपक्रम तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणकावर हाताळणी करता येईल अशी सुसज्ज रचना बसमध्ये करण्यात आली आहे.महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी जोडण्यासाठी आणि स्पर्धात्मक युगात सक्षम करण्यासाठी ही संगणक शिक्षण बस उपयुक्त ठरणार आहे.

डिजिटल साक्षरतेकडे वाटचाल करणाऱ्या या उपक्रमामुळे शाळांमधील शिक्षण अधिक सशक्त, परिणामकारक आणि भविष्याभिमुख होणार आहे. या बसची सुरुवात पारडी मराठी शाळेतून झाली असली तरी पुढील तीन महिन्यांपर्यंत ही बस मनपाच्या विविध शाळांमध्ये फिरून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देईल. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन उच्च प्राथमिक शाळांमध्ये ही बस नियोजित वेळापत्रकानुसार पोहोचेल. त्यातून केवळ शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही मोठा बदल घडेल.

Nagpur : वीज निर्माणात अदानीची भरारी, विदर्भात आर्थिक परिवर्तनाची तयारी

स्वप्नांना टेक्नोलॉजीची पंख

विंग्स फ्लाय हाय हा उपक्रम विद्यार्थ्यांना आधुनिकतेची आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देत आहे. या उपक्रमामुळे शहरातील विद्यार्थ्यांनाही कॉम्प्युटर साक्षरतेचा अनुभव मिळणार आहे. त्यांच्या भविष्याच्या उड्डाणाला खऱ्या अर्थाने पंख मिळणार आहेत. महापालिकेच्या शाळा म्हणजे गुणवत्तेचं शिक्षण देणाऱ्या संस्था बनवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल आहे. हा उपक्रम फक्त शिक्षणपुरता मर्यादित नसून, तो विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यास, नव्या संधींच्या दारात पोहोचण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर शिकवण्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. नागपूर महापालिकेच्या या पुढाकारामुळे शाळांमध्ये नवसंजीवनी येणार असून ‘शाळा बदलतेय… भविष्य घडवतेय’ हे वाक्य प्रत्यक्षात उतरल्यासारखे भासेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!