प्रशासन

Krishna Khopde : नागपूरमध्ये पुन्हा वाढला महापुराचा धोका

Nagpur Nag River : ड्रोनच्या नजरेत सापडले पाणी साचण्याचे सिक्रेट

Author

नागपूरमध्ये अवकाळी पावसाळ्यामुळे पुराचा धोका वाढल्याने भाजपने महानगरपालिकेच्या नदी-नाल्यांच्या साफसफाईवर आक्रमक सवाल उपस्थित केले आहेत.

पावसाळा आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभा आहे. यंदाही अवकाळी पावसाने अनेक भागांमध्ये संकट उभे केले आहे. पूर्वीच्या पावसाळ्यांप्रमाणेच यंदाही अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचणे, रस्ते बंद पडणे आणि खड्ड्यात पाणी साचण्याच्या समस्या उभ्या राहिल्या आहेत. महाराष्ट्रात हा अवकाळी पाऊस टाळता आला नाही, मात्र उपराजधानी नागपूरने या वर्षी महापुराच्या भीतीने पुन्हा संकट टाळण्याची तयारी केली पाहिजे. मागील दोन वर्षांपासून महापालिकेत महापुराचा अनुभव असूनही, नागपूरमध्ये पुन्हा अशाच आपत्तीकडे वाटचाल होणार नाही यासाठी भाजपचे कार्यकर्ते सजग आणि आक्रमक झाले आहेत.

पावसाळा सुरू झाला तरीही नागपूर महानगरपालिकेने नगरातील नदी-नाल्यांची साफसफाई पूर्णपणे केली नाही, हे स्पष्ट झाल्याने पुराच्या धोका वाढल्याचे चिन्ह दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप सरकार आता अधिक कठोर भूमिकेत दिसत आहे. नागपूरमध्ये मान्सून येण्याआधी मनपा प्रशासन नदी-नाल्यांच्या साफसफाईचा दावा करत असताना, भाजपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर, नागपूर पूर्वचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके यांनी मनपा प्रशासनाच्या या दाव्यांवर कठोर प्रश्न उपस्थित केले आहेत. नुकत्याच झालेल्या चर्चेत दोन्ही नेत्यांनी मनपाच्या सफाईचे वास्तव उघड केले.

Yavatmal : थेंब थेंब पाण्याचे स्वप्न अन् रखडलेल्या कामांची वाळवंटे

तातडीने कारवाई अपेक्षा

दटके यांनी नागरिकांनी अनुभवलेले अडथळे, पाणी साचणे यावर चिंता व्यक्त केली. 23 सप्टेंबर 2023 रोजी नागपूरमध्ये झालेल्या महापुरामुळे नागरिकांमध्ये पावसाळी काळात भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीचा पुनरावृत्ती होणार नाही यासाठी मनपाला तत्परपणे काम करावे लागेल, अशी अपेक्षा सर्वांमध्ये आहे. मात्र, मनपाकडे अद्याप नदी-नाल्यांची सफाई अपूर्ण असून जनप्रतिनिधी सतत या विषयावर प्रश्न उपस्थित करत आहेत.भाजपचे माजी आमदार कृष्णा खोपडे यांनी मनपा प्रशासनाच्या सफाईवरही प्रश्न उपस्थित करत म्हटले की, राज्य सरकारकडून नदी आणि नाल्यांच्या संरक्षणासाठी निधी दिला गेला तरीही काम वेळेवर पूर्ण झालेले नाही.

संरक्षण भिंतीचे काम पेटी कॉन्ट्रॅक्टरकडे देण्यात आल्यामुळे उशीर झाला असून, यामुळे मनपाच्या तयारीवर संशय निर्माण झाला आहे.मध्य नागपूरचे भाजपा आमदार प्रवीण दटके यांनी नाग नदीची साफसफाई दिग्दर्शनी असल्याचा आरोप करत नाग नदीचे ड्रोनद्वारे केलेले चित्रण सार्वजनिक केले. या चित्रणातून नदीत अजूनही मोठ्या प्रमाणावर कचरा आणि घाण साचलेली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मनपाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.भाजप कार्यकर्ते आणि नेते याविषयी सतत आवाज उठवत असून, नागपूर महानगरपालिकेने जलप्रलय टाळण्यासाठी वेगाने तयारी करावी अशी मागणी करत आहेत. नदी-नाल्यांच्या साफसफाईवर आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपने आता प्रशासनाकडे तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Prakash Ambedkar : वंचितांच्या हातात वैद्यकीय साधनांऐवजी दगड का?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!