महाराष्ट्र

Bhandara : सहकाराच्या सिंहासनावर फुके-पटेल विराजमान, नानांचे मनसुबे धुळीस

Co-operative Bank Elections : नऊ वर्षांच्या प्रतीक्षानंतर फडकविला झेंडा

Share:

Author

नऊ वर्षांनंतर पार पडलेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जबर धक्का बसला आहे. खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचा पराभव होत प्रफुल्ल पटेल-फुके यांच्या गटाने बहुमताचे यश मिळवले आहे.

तब्बल नऊ वर्षांनंतर भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक शनिवारी, 27 जुलै रोजी पार पडली. 2015 नंतर प्रथमच होणाऱ्या या निवडणुकीकडे जिल्ह्याचं आणि राज्याचंही लक्ष लागलेलं होतं. ही निवडणूक केवळ आर्थिक संस्थेपुरती मर्यादित नसून, स्थानिक राजकारणात मोठं राजकीय महत्त्व असलेली मानली जात होती. त्यामुळेच काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी अशा सर्व प्रमुख पक्षांनी या लढतीला प्रतिष्ठेची लढाई मानून तयारी केली होती.

या निवडणुकीत काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनल’ने संपूर्ण ताकदीने सहभाग घेतला. मात्र, या पॅनलला अपेक्षित यश मिळालं नाही. मतदारांनी स्पष्टपणे परिवर्तन पॅनलला नाकारत, त्यांचा पराभव केला. परिणामी नाना पटोले यांच्यासाठी हा पराभव राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या पॅनलला स्थानिक सहकारी संस्थांचा, मतदारांचा पाठिंबा लाभला नाही, ही बाब काँग्रेससाठी चिंतेची ठरणार आहे.

Parinay Fuke : सहकारात नेतृत्व फिक्स, महायुतीच मारणार विजयाचा ‘सिक्स’ 

ताकद पुन्हा सिद्ध

या निवडणुकीत भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या समर्थित पॅनलने जोरदार विजय मिळवला. त्यांनी काटेकोर रणनीती आखत उमेदवार उभे केले आणि सर्व गटांवर प्रभावी पकड निर्माण केली. युतीच्या नेतृत्वाखालील पॅनलने विविध कार्यकारी गट, दुग्ध संघ, आदिवासी प्रवर्ग आदी जागांवर विजय मिळवत सहकार क्षेत्रातील आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. हा विजय भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीसाठी मोठा बळ ठरणार आहे. निवडणूक प्रक्रिया दरम्यान परिणय फुके यांनी महायुतीच्या पॅनलचा विजय होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता.

या निवडणुकीत अनेक महत्त्वाच्या जागांवर युती पॅनलने वर्चस्व राखलं. दुग्ध संघातून सुनिलभाऊ फुंडे, तर भंडारा कार्यकारी गटातून सार्वे अनिल हरीचंद्र विजयी झाले. लाखनी गटातून बोरकर धर्मेंद्र, मोहाडीमधून कारेमोरे विश्वनाथ आणि साकोलीमधून कापगते होमराज यांनी यश मिळवलं. परिवर्तन पॅनलच्या बाजूने काही उमेदवार विजयी झाले असले तरी संपूर्ण संचालक मंडळावर युती पॅनलचा प्रभाव स्पष्ट दिसून आला.

Bhandara : मतपेटीतून ठरणार सहकाराचा शिल्पकार

दारुण पराभव

या पराभवाचा नाना पटोले यांच्या नेतृत्वावर परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात काँग्रेसने आपली पकड गमावली असून, याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो. ही निवडणूक काँग्रेससाठी केवळ पराभव नसून, संघटनात्मक मर्यादांचं संकेत मानली जात आहे.

एकूणच, भंडारा जिल्हा सहकार क्षेत्रातील ही निवडणूक ‘सत्तेच्या दारावरची झुंज’ ठरली. नाना पटोले यांच्या पॅनलचा पराभव आणि फुके-पटेल पॅनलचा विजय हे दाखवून देतात की, संघटन, स्थानिक उपस्थिती आणि रणनीती यांची त्रिसूत्री प्रभावीपणे अमलात आणणाऱ्यांचा विजय सहकारात निश्चित असतो. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही नवे समीकरण तयार होणार, हे नक्की.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!