महाराष्ट्र

Narahari Zirwal : भेसळीवर चर्चा आणि शब्दांमध्येच भेसळ

Monsoon Session : झिरवळांच्या शब्दांमुळे सभागृहात हास्याची लाट

Author

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंत्री नरहरी झिरवळ यांची जीभ घसरली आणि सभागृहात हास्याची लाट उसळली. गंभीर प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी आमदारालाच ‘मंत्री महोदय’ म्हणत संबोधलं आणि क्षणातच वातावरण हलकंफुलकं झालं.

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या गंभीर विषयांच्या वाद-विवादात रंगत असताना, सोमवारी विधानसभेत एक क्षण असा आला, जेव्हा सभागृहात हास्याची खसखस पिकली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी एका आमदाराला चक्क दोनदा ‘मंत्री महोदय’ म्हणत संबोधलं आणि साऱ्या सभागृहात एक हलकासा हास्यप्रसंग घडला.

दुसरीकडे, अक्कलकुवा मतदारसंघातील एक गंभीर प्रश्नही सभागृहात मांडण्यात आला. त्या भागात भेसळयुक्त खाद्यतेल विक्रीमुळे लोकांमध्ये गंभीर आजारांचा उद्रेक झाल्याचं निदर्शनास आलं. या गंभीर पार्श्वभूमीवर आमदार आमश्या पाडवी यांनी आवाज उठवला. त्यांनी आपल्या मतदारसंघात सुरू असलेल्या खाद्यतेल भेसळीबाबत सरकारचं लक्ष वेधलं.

Yashomati Thakur : भाषेच्या मुद्द्यावर तोंडसुख घेणाऱ्यांची मर्यादा हरवतेय

विषयासोबत हसरा क्षण

सभागृहात अक्कलकुवा तालुक्यातील तेल भेसळीचा प्रश्न मांडताना आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितलं की, त्यांच्या मतदारसंघात काही टँकर फॅक्टरीच्या माध्यमातून भेसळयुक्त खाद्यतेल विक्री केली जात आहे. हा संपूर्ण आदिवासी भाग असल्याने तेथील लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. काही नागरिकांना कर्करोग तर काहींना अन्य गंभीर आजारांनी ग्रासलं आहे. याप्रकरणी आधीही 25 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता, पण काही दिवसांत पुन्हा तीच विक्री सुरू झाली.

हे सर्व ऐकून मंत्री नरहरी झिरवळ यांनी उत्तर देण्यासाठी उभं राहताच, त्यांनी उत्साहाच्या भरात आमश्या पाडवी यांना ‘मंत्री महोदय’ म्हणत संबोधलं. सभागृहात बसलेल्या अनेक आमदारांच्या चेहऱ्यावर ताबडतोब हास्य उमटलं. स्वतः झिरवळ यांनाही चूक कळताच त्यांनी सॉरी म्हणत दुरुस्ती केली. पण त्यानंतर पुन्हा तेच विधान करताना पुन्हा एकदा ‘मंत्री महोदयांनी विचारलेला प्रश्न…’ असं बोलून गेले. यावेळी मात्र सभागृहात एकच हास्याचे फवारे उडाले.

Akola : पुतळा जळला, आता विश्वासही फसला; नेत्याचं नाव सांगत विद्यार्थ्यांनाही लुटला

अध्यक्षांची मिश्किल टिप्पणी

विनोदी घडामोडीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आपल्या मिश्किल शैलीत वातावरण हलकं केलं. त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल का? अशी टिप्पणी करत नार्वेकर यांनी गदारोळ करणाऱ्या आमदारांना थांबवलं. सभागृहात काही क्षण वातावरण हलकंफुलकं झालं. गंभीर प्रश्नावर चर्चा सुरू असतानाही हे हास्याचे क्षण सर्वांनीच मनापासून अनुभवले. हास्याचा क्षण जरी रंगला असला तरी भेसळीचा विषय अत्यंत गंभीर होता. त्यावर बोलताना नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं की, आमदार पाडवी यांनी मांडलेला मुद्दा अत्यंत गंभीर आहे.

त्यांच्या मतदारसंघात मे. गोपाल प्रोव्हिजन नावाच्या कंपनीकडून तेलाचे उत्पादन केले जात आहे. या कंपनीविरोधात प्रशासनाकडे तक्रारी असून, विविध वेळा नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. ते नमुने अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले असून, कंपनीच्या मालकाविरोधात महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात राज्यातही गुन्हे दाखल आहेत. सध्या नमुन्यांची अधिकृत तपासणी सुरू आहे. अहवाल येताच संबंधित कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल. ती त्वरित बंद करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिलं.

अधिवेशनाच्या सत्रात या घडामोडीने एका गंभीर आरोग्यविषयक प्रश्नाची दखल घेतली गेली. त्याचवेळी एक लाघवी हास्याचा क्षणही अनुभवता आला. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात राज्य सरकार कठोर भूमिका घेणार असल्याची ग्वाही दिल्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात समाधान निर्माण झालं. राजकारणातील तणावपूर्ण वातावरणात अशा विनोदी प्रसंगांमुळे सभागृहात मानवीपणाची एक झलक उमटते, मात्र त्याचवेळी ज्या प्रश्नामुळे ही चर्चा घडली. आदिवासी भागात भेसळयुक्त तेलामुळे आरोग्यावर होत असलेला परिणाम याकडे गांभीर्याने पाहणं हीच काळाची गरज आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!