महाराष्ट्र

Ravi Rana : घरात घुसून मारायचं असेल तर आम्ही तयार आहोत

Amravati : नवनीत राणांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून वाढले तनावाचे वातावरण

Author

अमरावतीत भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावरून अमरावतीच्या राजकारणात चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

अमरावतीत राजकीय तापमान वाढलंय. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांवर जीवे मारण्याच्या धमक्यांचा तांडव सुरू झाला आहे. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या रीलमुळे नवनीत राणा सातत्याने ट्रोलिंग आणि वादविवादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नुकतंच त्यांनी पावसात ‘किसी के हाथ न आयेगी ये लड़की’ या गाण्यावर एक रील पोस्ट केली होती, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली. मात्र, या रीलने त्यांना काही ट्रोलर्सचे लक्ष्यही बनवले आणि या ट्रोलिंगने आता जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत पोहोचले आहे.

अमरावती गुन्हे शाखेने यावर आता गंभीर भूमिका घेतली आहे. तीन दिवसांपासून व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये नवनीत राणांना जीवे मारण्याच्या धमक्यांचा उल्लेख आहे. या प्रकरणी छत्तीसगडमधून इसा नावाचा एक तरुण अटक करण्यात आला आहे. आमदार रवी राणांच्या म्हणण्यानुसार, नवनीत यांच्या हत्येच्या कटासाठी आठ ते दहा मुस्लिम तरुणांची बैठक झाल्याची माहिती पोलिसांनी उघड केली आहे. या संदर्भात आमदार रवी राणांनी कडक प्रतिक्रिया दिल्या असून, त्यांनी धमकी देणाऱ्या या तरुणांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली आहे.

Vijay Wadettiwar : ज्याची संख्या भारी, त्याची तितकी हिस्सेदारी

लाडक्या बहिणींची मागणी

रवी राणा म्हणाले, मुस्लिम तरुणांनी नवनीत राणांना दिलेल्या धमक्यांमध्ये ८-१० जण सहभागी आहेत. मुस्लिम समाजाने अशा प्रकारची वागणूक देऊ नये. जर राज्यातील कुणीही महिलेबरोबर असे वागले तर आम्ही कधीही आणि कुठेही घरात घुसूनही त्यांना ठणकावू, याचा इशारा आम्ही देतो. भर चौकात कायदा-सुव्यवस्था असले तरीही जर कोणीतरी हल्ला केला, तर युवा स्वाभिमान पक्ष त्याला झोडण्याचा वेगळाच मार्ग शोधेल, असा थेट इशारा त्यांनी दिला. दरम्यान, आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.

कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी रवी राणांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या आणि राजकीय वातावरणात थोडा गोडवा मिसळला. या लाडक्या बहिणींची एक खास मागणीही आहे. त्यांच्या लाभाची रक्कम दुप्पट करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यास आमदार रवी राणांना सुचवली आहे. असं झाल्यास या बहिणींचा आशीर्वाद सदैव देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी राहील, असंही काही स्थानिकांनी म्हणत राजकीय रंगत आणखी वाढवली आहे. या सगळ्या घटनांमुळे अमरावतीतील राजकारण अधिकच तापले असून, आगामी काळात या प्रकरणाचा काय उलगडा होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Ramtek : विकासाचा दरवाजा खुला, राज्यमंत्र्यांचा गतिमान फॉर्म्युला

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!