राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आक्रमक शैलीने आणि थेट वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले आमदार अमोल मिटकरी लवकरच मराठी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेण्याच्या चर्चेत आहेत.
‘बिग बॉस’ हा शो म्हणजे नुसते मनोरंजन नव्हे, तर एक भावनांचा, नाट्याचा आणि वादांचा महासागर. मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची चर्चा सध्या महाराष्ट्रभर गाजतेय. यंदा या घरात कोण कोणत्या रंगात रंगणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. पण यंदाच्या सीझनला एक तिखट ट्विस्ट मिळणार असे दिसतंय. कारण राजकारणाच्या रणधुमाळीतून थेट बिग बॉसच्या रंगमंचावर उतरण्याची तयारी करतायत, अजित पवार गटाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी. होय, हेच ते अमोल मिटकरी, ज्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि धारदार शैलीने विरोधकांना नेहमीच चक्रावून टाकले. आता हेच अमोल मिटकरी बिग बॉसच्या घरात काय धमाल उडवणार, याची उत्सुकता सगळ्यांना लागलीय. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात आपल्या आक्रमक शैलीने आणि वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी आता थेट बिग बॉसच्या रंगमंचावर उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हिंदी बिग बॉसचा तडका सलमान खानच्या स्टाईलने गाजत असताना, मराठी बिग बॉसच्या नव्या पर्वात राजकीय ट्विस्ट येणार का, असा प्रश्न सर्वत्र पडलाय. याचे कारण आहे मराठी बिग बॉसचे होस्ट, दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा एक व्हायरल व्हिडीओ. ज्यात त्यांनी थेट मिटकरींना बिग बॉसच्या घरात पाहण्याची इच्छा व्यक्त केलीय. या व्हिडीओ नंतर अमोल मिटकरींच्या चाहत्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिटकरी, जे नेहमीच आपल्या बेधडक आणि तिखट बोलण्याने विरोधकांना चक्रावून सोडतात, ते बिग बॉसच्या घरात काय धमाल उडवतील, याची उत्सुकता सगळ्यांना लागलीय. अमोल मिटकरींनी या ऑफरबद्दल महेश मांजरेकरांचे आभार मानले असले, तरी त्यांनी आपला खास ‘दादा’ स्टाईल टच देत म्हटलंय, ‘हा माझा सन्मान आहे, पण निर्णय घेण्याआधी माझ्या बिग बॉसला, म्हणजे अजितदादांना विचारावे लागेल.
Amravati : महायुतीच्या मित्रपक्षांचा दोस्ताना लढा, कोण ठरेल बादशहा?
राजकारणातून घरात धमाका
आता अजित पवार मिटकरींना बिग बॉसच्या घरात ‘नॉमिनेट’ करतात की नाही, हे पाहणे रंजक ठरेल. अमोल मिटकरींची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली, तर हा शो नक्कीच ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ बनणार, यात शंका नाही. त्यांचा आक्रमक स्वभाव, बेधडक वक्तव्य आणि विरोधकांना चिमटे काढण्याची खास शैली बिग बॉसच्या घरात कशी गाजेल, याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मिटकरी स्वतः म्हणाले, सध्या निवडणूक आणि पक्षाचे काम यामुळे वेळ नाही, पण अजितदादांनी हिरवा कंदील दाखवला, तर मी बिग बॉसच्या घरात नक्कीच धमाका करेन. आता प्रश्न हा आहे की, मिटकरी बिग बॉसच्या घरात ‘कॅप्टन’ बनतील की ‘नॉमिनेशन’च्या आगीत पडतील? दरम्यान, मिटकरींच्या राजकीय कामगिरीबद्दलही चर्चा जोरात आहे.
मिटकरींनी अलीकडेच राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडे राम गणेश गडकरी यांच्या ‘राज्यसंन्यास’ नाटकाबाबत आक्षेप नोंदवला होता. या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आरोप मिटकरींनी केला होता. त्यांच्या या आक्षेपाला मंडळाने मान्यता देत ‘संपूर्ण गडकरी खंड 1’ मधून हे नाटक वगळण्याचा निर्णय घेतलाय. याबद्दल अमोल मिटकरींनी सरकार आणि मंडळाचे आभार मानले. आता प्रश्न उरलाय तो हा, की मिटकरी बिग बॉसच्या घरात जाणार की राजकारणातच आपली आक्रमक शैली कायम ठेवणार? त्यांच्या चाहत्यांना मात्र मिटकरी बिग बॉसच्या घरात गेल्यास काय धमाल होईल, याची उत्सुकता लागलीय. मिटकरींची बेधडक शैली, त्यांचे तिखट बोल आणि राजकीय डावपेच जर बिग बॉसच्या घरात दिसले, तर हा शो मराठी मनोरंजन विश्वात नवा इतिहास रचेल, यात शंका नाही.
Corporation Election : देवाभाऊंच्या मतदारसंघात पुन्हा झिंगझिंग झिंगाट
