महाराष्ट्र

हायवेच्या कामासाठी Nitin Gadkari स्वत: नेणार बुलडोजर

भाषण करताना Goa येथे काय म्हणाले दळणवळण मंत्री

Post View : 16

Author

आपल्या तडकफडक बोलण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी ओळखले जातात. हायवेमॅन असलेल्या गडकरी यांनी आता स्वत: बुलडोजर चालविण्याची तयारी केली आहे.

अतिक्रमणांची संख्या अधिक असल्यानं महामार्गाची कामं रखडतात. अशी अतिक्रमणं काढताना प्रशासनाला बराच वेळ घालवावा लागतो. कोर्टकचेऱ्यांमध्ये वेळेचा अपव्यय होतो. आता याच अतिक्रमणाच्या मुद्द्यावर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रोखठोक भाष्य केलं आहे. गडकरी यांनी मंगळवारी गोव्यातील वास्को येथे एका प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. सुमारे 4 हजार 200 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. यातून सहा राष्ट्रीय महामार्ग तयार केले जाणार आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन गडकरी यांनी केलं. त्यावेळी त्यांनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

सहा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांमुळं गोव्याचं चित्र बदलणार आहे. दक्षिण गोव्याला जोडणारे रस्ते आणि आधुनिक सुविधा प्रदान केल्या जात आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली. महामार्गाच्या प्रकल्पात अतिक्रमण मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळं अतिक्रमण तत्काळ हटवून प्रकल्प मार्गी लावावे, असं नितीन गडकरी म्हणाले. अधिकाऱ्यांनी तातडीनं अतिक्रमणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा. अधिकारी हे करण्यात असमर्थ ठरले तर आपण स्वत: बुलडोजर घेऊन येऊ, असंही गडकरी म्हणाले.

BJP मध्ये प्रत्येक मंत्राकडे राहणार एक स्वीय सहाय्यक 

अडवणूक करणाऱ्यांना दम

नितीन गडकरी यांनी प्रकल्पांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. अनेक प्रकल्पांचं निरीक्षण आपण केलं. आपल्याला सरकारी लोकच अतिक्रमण करीत असल्याचं दिसलं. रस्त्याचं निरीक्षण केलं. तेव्हा आपल्याला हा प्रकार लक्षात आला. सरकारी लोकांनीच अतिक्रमण केल्याचा संशय येतो. रस्त्यांची रुंदी मला बरोबर वाटत नाही. कोणत्याही प्रकल्पात रस्त्याचं काम करताना काळजी घ्या. रस्त्याचं मोजमाप करावं. कोणी अतिक्रमण केलं असेल तर ते तत्काळ हटविण्यात यावं. कोणी अतिक्रमण हटविणार नसेल तर आपण स्वत: बुलडोजर चालवू, असंही गडकरी म्हणाले.

केवळ दंड आकारत रस्त्यांवरील अपघात कमी होणार नाही. पोलिसांनी दांडा उगारूनही अपघात कमी होणार नाही. लोकांनी सावधगिरी बाळगायला हवी. वारंवार ज्या ठिकणी अपघात घडतात असे ब्लॅकस्पॉट शोधण्यात यावं. त्यातून अपघात कमी होती. प्राणहानी टळेल असंही गडकरी म्हणाले. गोव्याला प्रदूषण आणि अपघातमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत, असंही ते म्हणाले. कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गडकरी यांचे आभार मानले. केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारमुळं गोव्याचा विकास होत आहे. 50 वर्षांत गोव्याचा विकास झाला नव्हता. मात्र गेल्या 14 वर्षात गोव्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलल्याचंही सावंत म्हणाले. गडकरी यांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पाचा गोव्याला पुढची 25 वर्ष लाभ मिळणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!