महाराष्ट्र

भविष्यातील इंधनाबद्दल Nitin Gadkari यांनी सांगितलं

देशातील Farmer पुरविणार वाहनांना ऊर्जा

Post View : 43

Author

भारतामधील दळणवळण व्यवस्था बदलणार आहे. सध्या इंधनाचे दर लग्नाला भिडत आहेत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भविष्याचा वेध घेणारी माहिती दिली. 

देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढत आहे. या वाहनांसाठी तितकेच मोठ्या प्रमाणावर इंधनसाठा लागणार आहे. भारतामध्ये इंधन आजही आयात करावे लागते. मात्र भविष्य भारतातील शेतकरी हा इंधन पुरवठा करणारा व्यक्ती ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. हायवे मॅनच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या गडकरी यांनी भविष्यातील इंधनाबद्दल माहिती दिली.

भविष्यामध्ये वाहनात हायड्रोजन इंधन वापर करण्यावर जोर द्यावा लागेल. हायड्रोजनचा हा पुरवठा देशातील शेतकरी करू शकतील. भारतामधील ऑटोमोबाईल क्षेत्राने आतापर्यंत सुमारे साडेचार कोटी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही संख्या वाढत जाणार आहे. नागरिकांना वाहनांची लागणारी संख्या देखील भविष्यामध्ये वाढणार आहे. वाहनांची संख्या लक्षात घेता भविष्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या पलीकडे जावे लागेल, असे गडकरी म्हणाले.

NextGen इंधन गरजेचे 

पेट्रोल आणि डिझेलचा जगभरातील साठा मर्यादित आहे. नैसर्गिक इंधनाची क्षमता लक्षात घेता वेगळ्या पद्धतीचे इंधन वाहनांमध्ये वापरावे लागेल. आजच्या घडीला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले जात आहे. भविष्यामध्ये इथेनॉल आणि हायड्रोजन वापर मोठ्या प्रमाणावर. इथेनॉल आणि हायड्रोजनची निर्मिती कृषी उत्पादनांमधून शेतकऱ्यांना करता येईल. त्यामुळे भविष्यामध्ये शेतकरी हा भारतातील असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

यवतमाळच्या दोन Minister कडून शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम 

देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. या दुचाकी वाहनांमध्ये आता बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची संख्या बऱ्यापैकी वाढत आहे. मात्र चार चाकी वाहनांच्या बाबतीत अद्यापही पेट्रोल आणि डिझेलचा वापर इंधन म्हणून होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायड्रोजन या इंधनावर चालणाऱ्या वाहनाचा वापर सुरू केला आहे. इथेनॉल आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांचा नितीन गडकरी हे पाठपुरावा करीत आहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाबाबतही नितीन गडकरी यांनी आगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे केंद्र सरकारने इथेनॉल ब्लेंडिंग बाबत आपले धोरण बदलले होते. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढावे, यासाठी देखील नितीन गडकरी सध्या प्रयत्न करीत आहेत. भविष्यामध्ये इथेनॉल आणि हायड्रोजन या इंधनाची गरज पडेल. त्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी तयार राहावं, असा आवाहन देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.

देशातील प्रदूषण कमी व्हावं असं आवाहन देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांनी काही कामं वाहनांचा वापर न करता करावी, असा आवाहन देखील नितीन गडकरी यांनी केलं. वाहनांचा वापर मर्यादित झाला तर प्रदूषणाची समस्या देखील दूर होईल, असे गडकरी म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!