महाराष्ट्र

Devendra Fadnavis : भारताच्या सामर्थ्याची खरी झळक महाराष्ट्रातून

Independence Day : ऑपरेशन सिंदूरमुळे देशाची ताकद जागतिक स्तरावर उभी

Post View : 45

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ऑपरेशन सिंदूर मधून भारताने आपली सामर्थ्य दाखवली आहे. महाराष्ट्रातील आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत.

2025 हे वर्ष भारताच्या राजकारणासाठी निर्णायक ठरले आहे. सुरुवातीस जम्मू-काश्मीर मधील पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देशाच्या सुरक्षा यंत्रणेत तणाव निर्माण केला. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी जलद आणि प्रभावी प्रतिसाद देत ऑपरेशन सिंदूर ही महत्त्वाकांक्षी मोहीम राबवली. या मोहिमेमुळे केवळ दहशतवाद्यांवर परिणाम झाला नाही, तर पाकिस्तान सुद्धा आपल्या विरुद्धच्या आक्रमक कारवाईत मागे हटले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेचे कौतुक करताना म्हटले, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने जगासमोर आपली सामर्थ्य आणि शिस्त दाखवली आहे.

भारतीय सैन्याने दहशतवादी तसेच पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांना उद्ध्वस्त करून नवीन भारताची ओळख निर्माण केली. या ऑपरेशनमध्ये सहभाग असलेल्या प्रत्येक सैनिकाचे मनापासून कौतुक केले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सातत्याने प्रगती करत आहे. गेल्या दहा वर्षांत देशाची अर्थव्यवस्था अकराव्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. आता कोणत्याही अडथळ्याने ही प्रगती थांबवता येणार नाही. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सर्वांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असेही त्यांनी आवाहन केले. विशेषतः महाराष्ट्राला या विकासामध्ये अग्रक्रम आहे.

Prakash Ambedkar : स्वातंत्र्य दिनाची धमाल, पण कटू वास्तव अद्याप डोक्यावर

गडचिरोलीत सुरक्षा सुधारणा

राज्यात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी 40 टक्के गुंतवणूक येत असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. उद्योग, उत्पादन, निर्यात आणि स्टार्ट-अप्सच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. शेतकरी वर्गासाठी फडणवीसांनी अनेक महत्वाच्या उपक्रमांची माहिती दिली. पुढील पाच वर्षांसाठी शेतकऱ्यांना मोजत वीज देण्यात येणार असून, ‘मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प’अंतर्गत दिवसा 12 तास हरित वीज उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. जे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच नदीजोड प्रकल्पांमुळे शेती आणि उद्योगांना पाणी मुबलक प्रमाणात मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा गौरव करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गडचिरोली पोलिसांनी माओवादी आणि नक्षलवाद्यांना हटवले असून, या जिल्ह्याला आता स्टील हब म्हणून विकसित केले जात आहे. येथील वाढवण बंदर, विमानतळाचे आधुनिकीकरण, समृद्धी महामार्गासह हजारांहून अधिक गावांमध्ये सिमेंट-काँक्रीटचे रस्ते बांधले जात आहेत. हे सर्व प्रकल्प महाराष्ट्राला शाश्वत विकासाच्या मार्गावर नेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी दाखवलेल्या वाटेवर महाराष्ट्र चालत राहील. विकास, सुरक्षेची हमी आणि शेतीसाठी नव्या योजना राज्याला समृद्धीच्या दिशेने नेत आहेत.

Atul Londhe : सत्याची बाजू मांडली अन् जिवे मारण्याची छाया पसरली

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!