महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत जागतिक पशु आहार शास्त्र परिषद नागपुरात पार पडली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यावेळी उपस्थित होत्या.
ग्रामीण भागाला शेती उद्योग सावरतो. शेतीला सावरणाऱ्या पूरक उद्योगांची गरज आहे. पशु-पक्षी पालन वाढणे गरजेचे आहे. मत्स्य व्यवसाय उद्योगाला भविष्यात अधिक शाश्वत करावे लागेल. जागतिक हवामान बदलाचा विचार केला जावा. प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्याचे काटेकोर नियोजन केले जावे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना अन्न सुरक्षितता गरजेची आहे. यासह शेतीपूरक उद्योग गरजेचे आहेत. अशा व्यवसायातून चांगल्या उत्पन्नाची संसाधने अधिक भक्कम होऊ शकतात. हे करण्यासाठी संशोधकांनी पुढे यावं, असं आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
नागपुरातूील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत जागतिक पशु आहार शास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रजत जयंती सभागृहात ही परिषद आयोजित करण्यात आली. समारंभाला पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., भारतीय कृषी अनुसंसाधन परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, पशुविज्ञान शाखेचे उपमहासंचालक डॉ. राघवेंद्र भट्ट, कुलगुरु डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. प्रविणकुमार देवरे व ज्येष्ठ संशोधक उपस्थित होते.
बदलापूर प्रकरण पुन्हा उधळले; Anil Deshmukh यांचा भाजपवर आरोप
पशुंना मोलाचं स्थान
भारतीय संस्कृतीने आपल्याला एक अमूल्य देणगी दिली आहे. पशुधन, वनसंवर्धन, पर्यावरण आणि शाश्वत जीवन शैली ही ती देणगी आहे. ईश्वरांनीही आपले वाहन पशुधनातून घेतले. याच पक्ष्यांनाही सन्मान दिला. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा व ज्ञानाच्या आधारावर शेतीला पशुधनाची जोड देण्यात आली. यातून अतिरिक्त उत्पादकता पूर्वजांनी घेऊन दाखविली.
कृषी क्षेत्रात संशोधकांनी कालपरत्वे योगदान दिलं. त्यांच्या सहाय्याने प्रगतीचा मोठा पल्ला गाठता आला. आजच्या घडीला दुधाच्या उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. ग्रामीण भागाला विकासाची नवी दिशा देण्याचे सामर्थ्य पशुवैद्यकीय शास्त्रात असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
दर्जाची महत्वाचा
उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीत वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे दुध, मांस, अंडी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यातील पोषण मुलद्रव्य वाढीस लागावे. पर्यावरणातील संतुलनही राखले जावे, असं त्या म्हणाले. मत्स्योत्पादन क्षेत्रातही अनेक संशोधनं झाली आहेत. जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्थापनापासून ते मत्स्य बीजोत्पादनाचा यात समावेश आहे. त्यांचे वजन, त्यांना अधिक पौष्टीक केले जात आहे. जलव्यवस्थापनातही काम झालं आहे. असे अनेक क्षेत्र संशोधकांसाठी खुले आहेत.
दुधाच्या गुणवत्तेपासून उपलब्धतेपर्यंत अनेक क्षेत्रात संशोधक योगदान देत आहेत. याच ज्ञानशाखेत आपले शिक्षण झाले. आपण जेथे शिकलो तेथे गुरुजनांच्या उपस्थितीत कार्यक्रमात सहभागी होता आले. त्याचा आनंद असल्याचं पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. म्हणाले. सर्व संशोधकांच्या योगदानातून एक उज्ज्वल मार्ग परिषदेतून मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी प्रास्ताविकात परिषदेचे महत्व विषद केले. पर्यावरणाच्या संतुलनासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. भविष्यातील मागणी लक्षात घेता या क्षेत्रात मोठी संधी आहे. विद्यापीठातील संशोधन ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
