विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरलेला भंडाऱ्यातील मेळावा संपन्न झाला. जिथे मानस ॲग्रो इंडस्ट्रिजने शेतकऱ्यांना समृद्धीच्या नव्या संधी दिल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत हा सोहळा विदर्भाच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरला.
महाराष्ट्रात यंदा पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्टी आणि पुराने शेतकरी संकटात सापडले आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत विदर्भाच्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा येथील करडी गावात मानस ॲग्रो इंडस्ट्रिज अँड इंफ्रास्ट्रक्चरच्या वतीने एक भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याने शेतकऱ्यांच्या आशांना नवी उभारी दिली. विदर्भाच्या प्रगतीचा एक नवा अध्याय लिहिला गेला. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीने विशेष रंगत आली. तर माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी आपल्या प्रेरक विचारांनी उपस्थितांचे मन जिंकले.
शेतकऱ्यांच्या या मेळाव्याने केवळ शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला नाही. तर विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीचा एक ठोस मार्गही दाखवला. मानस ॲग्रो इंडस्ट्रिजने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांनी या भागातील शेतीला नवसंजीवनी दिली आहे. डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली आणि नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने हा मेळावा शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
IPS Rushikesh Reddy : पोलिसांचे अ’समाधान’; सावजीवर घातली बंदी
हरित भविष्याची नांदी
मानस ॲग्रो इंडस्ट्रिजने विदर्भातील ऊस शेतीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना नगदी पिकाचा भक्कम आधार दिला आहे. या भागात ऊस लागवडीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, ऊस कारखान्याच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्नाचा स्रोत मिळाला आहे. यामुळे पूर्वी बाहेरच्या भागात जाणारा पैसा आता भंडारा-गोंदिया जिल्ह्यातच राहू लागला आहे. यासोबतच, नितीन गडकरी यांच्या प्रेरणेने ‘कटिंग अँड ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम’ या योजनेने स्थानिक मजुरांना ऊस तोडणीचे काम आणि ट्रॅक्टरधारकांना वाहतुकीची संधी उपलब्ध झाली आहे. या सर्व घडामोडींमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व गती मिळाली आहे.
मानस ॲग्रो इंडस्ट्रिज केवळ ऊस शेतीपुरते मर्यादित न राहता, कृषी प्रक्रिया, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊसिंग आणि डेअरी प्रकल्पांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवरही काम करत आहे. डॉ. परिणय फुके यांनी सांगितले की, कंपनी भविष्यात इथेनॉल ब्लेंडिंग, हरित ऊर्जा आणि बायो-सीएनजी निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. या उपक्रमांमुळे कारखाना ऊर्जेच्या स्वयंपूर्णतेचा आदर्श नमुना बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या सर्व योजनांमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य तर मिळेलच शिवाय पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळेल. यामुळे विदर्भातील शेतकरी समृद्धीच्या नव्या शिखरावर पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलवर अवलंबित्व कमी करणार CNG प्रकल्प
मेळाव्याला आमदार राजुभाऊ कारेमोरे, आमदार विजयजी रहांगडाले, सुनिल मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष आनुभाऊ गोंडाणे, बीडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष प्रदिप पडोळे, देव्हाडा कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराम कापगते, संचालक मोहम्मद तारिक कुरेशी, सुनिल लांजेवार, डॉ. अमृत सोनवाने, विजय हिवरकर, युवराज हुल आणि युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन बोफ्चे यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. परिणय फुके यांनी आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना, त्यांच्या मेहनतीला आणि या उपक्रमांना एका नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन केले.
