जेमिनी एआय Miniature Action Figure Generator ट्रेंडने सोशल मीडियावर धमाल केली आहे. या फीचरमुळे वापरकर्ते काही सेकंदांत स्टुडिओ-क्वालिटीचे 3D फिगर तयार करू शकतात.
इंटरनेटच्या दुनियेत कधी काय व्हायरल होईल, हे सांगणं म्हणजे जणू हवेत उडणाऱ्या पतंगाचा धागा शोधण्यासारखं आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर घिबली इमेजचा बोलबाला होता. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच आपले घिबली अवतार बनवून धमाल करत होते. चॅटजीपीटी आणि ग्रोकसारखी AI टूल्स यात आघाडीवर होती. आता पुन्हा एकदा एआयच्या नव्या फीचरने सगळ्यांना भुरळ घातली आहे. जेमिनी एआयच्या ‘Miniature Action Figure Generator’ या फीचरने तरुणाईला वेड लावलंय. हा ट्रेंड इतका जबरदस्त आहे की, रील्सपासून पोस्टपर्यंत सगळीकडे याचीच चर्चा आहे. हे फीचर वापरणं अगदी सोपं आहे.
जेमिनी एआयची वेबसाइट किंवा अॅप उघडा, तुमचा फोटो अपलोड करा, एक छोटा प्रॉम्प्ट द्या आणि काही क्षणांतच तुमचा 3D मिनिएचर फोटो तयार. खास बाब म्हणजे हे फीचर फ्री आणि पेड दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. मग तुम्ही जंगलात फिरताय, चंद्रावर उडी मारताय किंवा सुपरहिरोसारखे उडताय, AI तुमच्या कल्पनांना खरं करतं. ही सर्जनशीलतेची जादू प्रत्येकाला आपल्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाते. हा ट्रेंड आता केवळ तरुणांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही याची लाट उसळली आहे. यात आघाडीवर आहेत भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके.
Political Controversy : दादांचा वाद, पुतण्याचा आधार, राष्ट्रवादीत गोंधळ अपार
नवीन ट्रेंडची क्रांती
विकासाच्या गंगेला आपल्या जिल्ह्यात आणणारे डॉ. फुके यांनी या जेमिनी ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आणि सर्जनशीलतेचा नवा आदर्श घालून दिला. त्यांनी जेमिनी या एआयच्या फीचरचा वापर करून स्वतःचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक अनोखा मिनिएचर पुतळा तयार केला. हा फोटो पाहताच त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. सर्जनशीलतेने नेतृत्वाचा सन्मान करणे हा माझा उद्देश आहे. हा ट्रेंड फक्त मनोरंजनासाठी नाही, तर तो प्रेरणा आणि नवकल्पनांचा कॅनव्हास आहे, असं डॉ. फुके म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, हा छोटासा प्रयत्न म्हणजे दूरदर्शी नेतृत्वाचा उत्सव आणि नव्या कल्पनांना स्वीकारण्याचा माझा मार्ग आहे.
आपण सर्जनशीलतेला उद्देशाशी जोडत राहूया. त्यांच्या या शब्दांमधून त्यांचा नाविन्याचा दृष्टिकोन आणि काळासोबत बदलण्याची तयारी दिसून येते. डॉ. परिणय फुके हे नेहमीच विकासाच्या बाबतीत आघाडीवर राहिले आहेत. ‘विकास हाच आपला अजेंडा’ असं म्हणत त्यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात अनेक विकासकामांना गती दिली. नुकताच त्यांनी कुटुंबासह केलेल्या जापान दौऱ्यात त्यांनी तिथली अत्याधुनिक टेक्नॉलॉजी भारतात आणण्याची योजना आखली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. अशा प्रकारे ते नेहमीच नव्या ट्रेंड्स आणि तंत्रज्ञानासोबत पुढे जाणारे नेते आहेत. मग तो जेमिनी एआयच्या ट्रेंड असो किंवा जागतिक तंत्रज्ञान, डॉ. फुके यांचा दृष्टिकोन नेहमीच प्रगतीशील आहे.
Nana Patole : माजी प्रदेशाध्यक्षांना झटका; नुकसान भरपाई नाही
