महाराष्ट्र

Parinay Fuke : पूर्व विदर्भाचे स्वप्न आमदारांनी मांडले शासन दरबारी

Monsoon Session : शेतकऱ्यांच्या हितासाठी केली निधी वाढीची मागणी

Post View : 13

Author

पूर्व विदर्भ आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहणारे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशनाच्या विधान परिषदेत पूर्व विदर्भाच्या विकासासाठी ठसठशीत आवाज उठवला आहे.

राज्यात पूर्व विदर्भाचा उल्लेख अनेकदा मागासलेल्या आणि दुर्लक्षित भाग म्हणून केला जातो. रस्त्यांची दुर्दशा, सिंचनाचा अभाव, पाण्याचा अपुरा पुरवठा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी हे जणू या भागाचे स्थायी स्वरूप झाले होते. मात्र या परिस्थितीला मात देत, भंडारा-गोंदिया जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्यासाठी झटणारे नेतृत्व म्हणजे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा भाग आता विकासाच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागला आहे. शासन दरबारी सातत्याने निवेदने देणे, निधीसाठी मागणी करणे आणि विकासकामांसाठी सतत आवाज उठवणे ही डॉ. फुके यांची कार्यपद्धती असते.

विशेष म्हणजे त्यांनी केवळ निवडणुकीपुरती विकासाची भाषा केली नाही. तर सभागृहातही शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागासलेल्या भागातील गरजा बुलंद आवाजात मांडल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही त्यांनी आपली विकास विषयक बांधिलकी ठसठशीतपणे मांडली आहे. विधान परिषदेत राज्य सरकारच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना, डॉ. फुके यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासाचे अनेक पैलू सभागृहासमोर ठेवले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मानव विकास अभियानांतर्गत ट्रॅक्टर व शेती साहित्याचे वाटप शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले.

Abhijit Wanjarri : नुकसान ग्रस्तांच्या मदतीसाठी आमदाराची फ्लड फाइटर भूमिका

नेतृत्वाची कार्यक्षम झळाळी

परंतु गेल्या काही वर्षांपासून या योजनेसाठी निधीच मंजूर झालेला नाही, ही बाब खेदजनक आहे. सध्या राज्यातील 125 तालुके या योजनेच्या कक्षेत आहेत. त्यात या योजनेची भंडारा-गोंदियातील पाच तालुक्यांना मोठी गरज आहे. त्यामुळे यासाठी स्वतंत्र निधी राखीव ठेवावा, अशी त्यांनी स्पष्ट मागणी केली. या मागणी मागे शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची ठोस भूमिका आहे. डॉ. फुके यांनी ग्रामीण भागात अद्यापही प्रभावीपणे अंमलात न आलेल्या योजनांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी आरोग्य सेवा, शिक्षण, सिंचन, रस्ते आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी अधिक निधीची गरज असल्याचे सांगितले.

Vikas Thakre : उपराजधानीचा सत्यानाश पावसामुळे नाही तर नियोजनामुळे

विशेषतः आदिवासी व मागास भागांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च होतोय का, हा प्रश्न त्यांनी अत्यंत मुद्देसूदपणे मांडला. जनतेच्या कर रुपयांचा पैसा पारदर्शकतेने आणि उत्तरदायित्वाने खर्च झाला पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे, असे ठामपणे त्यांनी सांगितले. अनावश्यक खर्चांवर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. विकास फक्त आकड्यांपुरता मर्यादित न राहता, तो जमिनीवर उतरायला हवा हेच त्यांच्या भूमिकेचा केंद्रबिंदू होता. डॉ. परिणय फुके यांचे नेतृत्व म्हणजे केवळ घोषणांची धूळ नव्हे, तर कार्यक्षमतेची झळाळी आहे. मागासलेपणाच्या आरोपातून मुक्त होत पूर्व विदर्भाचा भंडारा-गोंदिया जिल्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या वाटचालीचा ठोस पाया म्हणजे त्यांचे परिश्रम.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!