
गोंदिया जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेसाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके पुढाकार घेतला.
पूर्व विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा देणारी, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना आता प्रत्यक्ष अंमलबजावणीत वाटचाल करत आहे. माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या दूरदृष्टीने प्रेरित ही योजना तलावांचा नवा चेहरा घेऊन येत आहे. यासाठी डॉ. फुके यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. गाळ काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीचे वापर करण्यात येणार आहे.

भंडारा गोंदियातील शेतकऱ्यांचे जीवनमान हे मासेमारी आणि अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेत डॉ. फुके यांनी पुढाकार घेत त्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न केले आहे. तलावात साचलेल्या गाळामुळे शेतकऱ्यांना समस्या होत आहे. मात्र आता ही समस्या लवकरच संपणार आहे. गाळ पुनर्वापरासाठी योग्य जागा कशी निवडावी, त्याचे नियोजन कसे करावे, यासाठी डॉ. परिणय फुके यांनी हिताचे काम केले आहे.
तलावांचे पुनरुज्जीवन सुरू
ग्रामस्तरावर गाळमुक्त योजनेची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, हे समजून घेताना अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे अनुभव मिळाले आहे. शंकांचे निरसन झाले आणि योजनेचा लाभ प्रत्यक्ष कसा मिळवायचा, याबद्दल शेतकऱ्यांना स्पष्टता मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी डॉ. परिणय फुके नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. तलावात साचणाऱ्या गाळामुळे जलसाठ्याची क्षमता मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतली आहे.
भंडारा-गोंदिया परिसरातील तब्बल 4 हजार 400 मामा तलाव आणि दहा प्रमुख धरणांमधून दरवर्षी लाखो घनमीटर गाळ काढण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश मिळत आहे. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीचेही मोठे साधन ठरत आहे. मोहिमेंतर्गत तलावांचे खोलीकरण, गाळ व्यवस्थापन आणि पुनरुज्जीवनासाठी विज्ञानाधिष्ठित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ही योजना जलसाठवण क्षमतेत लक्षणीय वाढ करेल आणि पाण्याच्या टंचाईला कायमस्वरूपी उत्तर देईल, असा विश्वास डॉ. परिणय फुके यांनी व्यक्त केला आहे.
जैवविविधतेचा विकास
योजना केवळ गाळ काढून तलाव खोल करण्यापुरती मर्यादित नाही. तर ती पर्यावरणपूरक जलसंपत्ती व्यवस्थापनाचा आराखडाच आहे. गाळयुक्त शिवारात गाळ टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. भूजल पुनर्भरणाला गती मिळते आणि जैवविविधतेचा विकास होतो. हे पहिल्यांदाच नाही की डॉ. फुके यांनी काम केले नाही. त्यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उंचावला आहे.
विशेषतः भंडारा गोंदियाच्या विकासासाठी ते नेहमी समोर आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भंडारा-गोंदियाचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने ही योजना जलक्रांतीचे मूर्त रूप घेईल, असा विश्वास डॉ. फुके यांनी व्यक्त केला आहे.