महाराष्ट्र

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात विदर्भ होणार का विकासाचे शिखर ?

नवीन Government कडून जनतेला मोठ्या अपेक्षा

Author

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरला गतिमान विकास मिळाला आहे. त्यानंतर आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ त्यांच्याकडे अपेक्षेच्या नजरेने पाहत आहे. 

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर मोठा बदल झाल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी जनतेची मोठी अपेक्षा आहे. विदर्भातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधींमध्ये सुधारणा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फडणवीस यांच्या मागील कार्यकाळात नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली होती. मेट्रो रेल्वे, उड्डाणपूल, आयटी पार्क आणि अन्य पायाभूत सुविधांमुळे नागपूरला मोठ्या संधी मिळाल्या. मात्र, विदर्भातील अन्य जिल्हे, विशेषतः यवतमाळ, वाशिम, गडचिरोली आणि चंद्रपूर यांसारख्या मागासलेल्या भागांमध्ये अपेक्षित प्रगती झाली नव्हती. यामुळे आता नवीन सरकारकडून अधिक व्यापक योजनांची अपेक्षा आहे.

पिक विम्याच्या रकमेसाठी Farmers करीत आहेत संघर्ष 

विशेष योजनांची गरज 

विदर्भात शेतकऱ्यांची अडचण दिवसेंदिवस वाढत आहे. योजनांचा वेळेवर लाभ मिळत नसल्याने शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सिंचन प्रकल्प, पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी मदतीच्या योजना आणण्याची मागणी होत आहे. मागील काळात जलयुक्त शिवार योजनेचा लाभ काही भागांमध्ये झाला. मात्र अद्यापही सिंचनाची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे.

विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती निर्माण करण्याची गरज आहे. नागपूरमध्ये एमआयडीसी, आयटी हब आणि लॉजिस्टिक हबसाठी प्रयत्न झाले असले, तरी अमरावती, अकोला, यवतमाळसारख्या ठिकाणी अद्याप औद्योगिक विकासाची गती मंद आहे. आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर नवीन सरकारकडून विदर्भात मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

नागपुरात Jal Jeevan योजनांचे थेंबे थेंबे तळे साचे

वैद्यकीय सुविधा, शिक्षणावर भर

आरोग्यसेवेच्या बाबतीत विदर्भातील ग्रामीण भाग अजूनही मागे आहे. गडचिरोली, चंद्रपूरसारख्या दुर्गम भागांत आरोग्य सुविधा आणि डॉक्टरांची कमतरता आहे. यासाठी नवीन सरकारी रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. नागपूर आणि अमरावती येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची मागणी वाढली आहे.

राज्यातील नवीन राजकीय समीकरणांमुळे विदर्भाला अधिक निधी मिळेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. फडणवीस यांना नागपूर आणि विदर्भाच्या विकासाची चांगली जाण आहे. त्यामुळे या भागाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी प्रत्यक्ष कामे वेगाने होणे गरजेचे आहे.

जनतेच्या अपेक्षा वाढल्या

सामान्य जनता आणि तरुणाई फडणवीस सरकारकडून मोठ्या आशेने बघत आहे. नागपूरला विकासाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या या नेतृत्वाकडून आता संपूर्ण विदर्भाच्या विकासाची अपेक्षा आहे. फडणवीस सरकार ही आव्हाने कशी पेलणार, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!