17 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विरोधी पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे.
17 सप्टेंबर 2025 हा दिवस भारतीय जनता पक्षासाठी एका उत्सवाच्या रुपात उजळून निघाला. याला कारण होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वाढदिवस. देशभरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जणू एका मोठ्या उत्सवाची तयारी केली होती. जिथे भाजपची सत्ता आहे, तिथे मोठमोठ्या कार्यक्रमांचा धुमाकूळ आणि जिथे नाही तिथेही कार्यकर्त्यांच्या उत्साहाने शुभेच्छांचा वर्षाव. मित्र पक्षांकडूनही मोदींना हार्दिक अभिनंदन, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षांची शांतता बोलकी होती. कोणीही मोदींना शुभेच्छा दिल्या नाहीत. असं वाटत असतानाच एक अपवाद घडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: मोदींना शुभेच्छा पाठवल्या. पण या शुभेच्छा इतक्या साध्या नव्हत्या. त्या राजकीय वादळाचा केंद्रबिंदू ठरल्या.
शरद पवारांच्या शुभेच्छा संदेशात असं लिहिलं होतं, ‘तुमच्या वाढदिवसानिमित्त, मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा देतो. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि दीर्घायुष्य लाभो. तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली आपल्या देशाची प्रगती सतत होत राहो आणि येणाऱ्या काळात त्याचे अधिकाधिक कल्याण आणि विकास होत राहो अशी मी प्रार्थना करतो.’ हे शब्द वरून साधे वाटतात, पण त्यात लपलेली ‘सक्षम मार्गदर्शन’ ही ओळ राजकीय वादळ उभं करणारी ठरली. महाराष्ट्रात विरोधात महाविकास आघाडी कार्यरत आहे. ज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी सामील आहेत. पण एमव्हीएच्या इतर पक्षांकडून मोदींना शुभेच्छा आल्या नाहीत, तरी पवारांनी दिल्या. याचं केंद्रबिंदू बनली वंचित बहुजन आघाडी. ज्याने या शुभेच्छांना धारेवर धरले.
Congress : बावनकुळेंच्या मतदारसंघात लुट; मत गेले आता जमीनही गिळली
क्रॉस-वोटिंगचा प्रभाव
वंचित बहुजन आघाडीने या शुभेच्छांना राजकीय रंग देत, काँग्रेस नेते राहुल गांधींना थेट आव्हान दिलं. ‘सक्षम नेतृत्व’ या शब्दांकडे लक्ष वेधत, व्हीबीएने म्हटले की, जेव्हा सर्व विरोधी पक्ष मोदींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत आहेत, तेव्हा पवार त्यांची प्रशंसा करून सर्व जबाबदाऱ्या पांढऱ्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हीबीएने राहुल गांधींना विचारले, राहुल गांधी, तुम्ही याच्याशी सहमत आहात का?. सोबतच उपराष्ट्रपती निवडणुकीतील क्रॉस-वोटिंगचा मुद्दा उपस्थित केला. नुकतीच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला. तर इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला. पण धक्कादायक म्हणजे, १५ वोट विरोधी पक्षांकडून राधाकृष्णनांना गेले. यात महाराष्ट्रातील एमव्हीएच्या खासदारांचा हात असल्याचा आरोप होत आहे.
व्हीबीएने राहुल गांधींना थेट सवाल केला, उपराष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग करणाऱ्या महाराष्ट्रातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या खासदारांवर तुम्ही आतापर्यंत कोणती कारवाई केली आहे? पुढे व्हीबीएने इंडिया आघाडीच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणले बाबासाहेबांच्या संवैधानिक मूल्यांचे आणि धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करण्यासाठी भारत आघाडी खरोखरच एकजूट झाली आहे का, की ती फक्त एक तात्पुरती गट आहे, जी सत्तेत आल्यानंतर भाजप-आरएसएसने नेहमीच जे केले आहे ते पुन्हा करेल? या वादातून एक गोष्ट स्पष्ट होते की, महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ सत्तेचा खेळ नाही, तर विश्वास आणि मूल्यांचा संघर्ष आहे. शरद पवारांच्या शुभेच्छा एका साध्या वाढदिवसाच्या अभिनंदनापलीकडे जाऊन, विरोधी पक्षांच्या एकजुटीला आव्हान देतात. व्हीबीएने या मुद्द्यावरून राहुल गांधींना आव्हान दिले आहे.
Chandrashekhar Bawankule : मोदींवर टीका करून लोकशाहीची थट्टा