देश

Prakash Ambedkar : मणिपूरला ‘रत्न’ म्हणणारे नरेंद्र मोदी मौन का?

Manipur Violence : जातीय शुद्धीकरण, लैंगिक हिंसा अन् गप्प पंतप्रधान

Post View : 34

Author

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूरमधील जातीय हिंसाचारावर पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर थेट आरोप केले आहे.

मणिपूरमधील हिंसाचाराच्या आगीत मानवता जळत असताना, वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर सणसणीत टीकास्त्र सोडले आहे. मोदींनी मणिपूरला भारताच्या मुकुटातील रत्न असे गौरवले होते. पण आंबेडकरांनी या शब्दांना ‘क्रूर थट्टा’ ठरवत सरकारच्या ढोंगीपणाचा पडदा फाडला. त्यांनी सात स्फोटक प्रश्न उपस्थित करत, मणिपूरच्या जखमेवर खपली चढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला खड्ड्यात ढकलले. आंबेडकरांचा रोष माजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्यावरही उफाळला.

लीक झालेल्या ऑडीओ टेप्समधून बिरेन सिंग यांचा हिंसाचारातील थेट सहभाग उघड झाल्याचा त्यांचा दावा आहे. तरीही, त्यांना पाठीशी घालण्यात आलं, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी लावला. ख्रिश्चन कुकी समाजावर अन्याय, जातीय शुद्धीकरण आणि सत्य दडपण्याचे थेट हल्ले त्यांनी सरकारवर चढवले. मणिपूर हे रत्न आहे, तर मग ही रक्तरंजित वागणूक कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुकी समाजाची घरे जाळली गेली, महिलांवर अत्याचार झाले, विस्थापितांचा आकडा हजारोंच्या घरात गेला, पण पंतप्रधानांचे मौन काय सांगते? आंबेडकरांनी विचारले, मोदींनी एक शब्दही का काढला नाही?

Nitin Deshmukh : भारतीय क्रिकेटपटूंना करणार काळ्या रंगात ‘आऊट’

नैतिक अधःपतनाचा प्रश्न

मणिपूर जळत असताना ते निवडणूक प्रचारात मग्न का होते? त्यांनी पंतप्रधानांच्या मणिपूर भेटीच्या अनुपस्थितीवर बोट ठेवत, त्यांच्या कथित संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. जर मणिपूर रत्न असेल, तर तिथल्या रक्तपातावर पंतप्रधान गप्प का? हा प्रश्न त्यांनी सरकारच्या मुळाशी लावला. आंबेडकरांनी आणखी एक मुद्दा ठळक केला. स्वतंत्र न्यायालयीन चौकशीचा अभाव. सामूहिक हत्याकांड, लैंगिक हिंसा, जाळपोळ यांवर सरकारने का कारवाई केली नाही? मोदी कोणाला वाचवत आहेत? कोणते सत्य लपवत आहेत? असा थेट सवाल त्यांनी विचारला. त्यांच्या मते, मणिपूरच्या या संकटात सरकारचा नैतिक अधःपतन स्पष्ट दिसतो.

मोदींच्या शब्दांत संवेदना नाही, फक्त ढोंग आहे, असे ते म्हणाले, हा सहानुभूतीचा मुखवटा नाही, तर सत्यापासून पळण्याचा घृणास्पद पडदा आहे. आंबेडकरांनी मणिपूरच्या प्रश्नावर ठोस उत्तर आणि कारवाईची मागणी केली. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ मणिपूरपुरते मर्यादित नाहीत, तर सरकारच्या संपूर्ण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह ठरतात. मणिपूरला रत्न म्हणणारे पंतप्रधान, तिथल्या रक्तपातावर मौन बाळगतात, हे नैतिक जबाबदारीचे लक्षण आहे का? असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या मते, मणिपूरच्या जखमेवर मलम लावण्याऐवजी सरकारने त्या जखमेला खपली चढवण्याचा प्रयत्न केला.

IPS Archit Chandak : चार पथक, दहा अधिकारी अन् पाच दिवस अखंड शोध

मणिपूरमधील हिंसाचार हा केवळ स्थानिक प्रश्न नसून, देशाच्या एकात्मतेचा आणि मानवतेचा प्रश्न आहे, असे आंबेडकरांचे मत आहे. त्यांनी सरकारला कठोर शब्दांत सुनावले की, जर मणिपूर रत्न असेल, तर त्याच्या रक्षणासाठी ठोस पावले का उचलली गेली नाहीत? त्यांच्या या प्रश्नांनी जनमानसात खळबळ उडवली असून, आता सरकार काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!