पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यामुळे शहरात मोठा उत्साह पाहायला मिळाला, पण त्याचबरोबर वाहतूक कोंडीने नागरिकांचेही हाल झाले. रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले आणि त्यांच्या या दौर्याने संपूर्ण शहराची धावपळ वाढली. त्यांनी सर्वप्रथम रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर, त्यांनी थेट दीक्षाभूमी गाठली आणि तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृतीला नतमस्तक झाले. मोदींच्या या दौऱ्याचा मुख्य हेतू होता. दोन महत्त्वाच्या विचारधारा आणि शक्तिकेंद्रांना अभिवादन करणे.
पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता, मात्र शहरातील अनेक नागरिकांना त्याचा विसर पडला. गुढीपाडव्याचा सण आणि रविवारी सुट्टी असल्याने अनेक नागपूरकर बाहेर पडले होते. मात्र, मोदींच्या सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले होते. परिणामी, अनेक नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मोदींचा काफिला नागपूरच्या अनेक परिसरातून जाणार असल्याचेही माहिती नाही.
PM Modi at Nagpur : संघ संस्कृतीपासून संरक्षण तंत्रज्ञानापर्यंत
मेट्रोची सुविधा
मोदींना या दौऱ्यात ‘स्पेशल डेस्पिजी’ सुरक्षा मिळाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख यांना पंतप्रधानांच्या खालोखाल सुरक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. नितीन गडकरी यांनाही झेड प्लस सुरक्षा मिळाली आहे. नागपूरचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनाही सुरक्षा मिळाली आहे. अनेक आमदार खासदार मोदींच्या दौऱ्यासाठी नागपुरात आहेत.
नागपूर शहरात 30 मार्च रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत माधव नेत्रालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा आरोग्यविषयक प्रकल्प नागपूर आणि विदर्भातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांची मोठी उपस्थिती पाहता महामेट्रो प्रशासनानेही विशेष सुविधा जाहीर केल्या आहेत. महामेट्रोच्या एक्वा लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दर आठ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे, जेणेकरून नागरिकांना सोयीस्कर प्रवास करता येईल.
पोलिसांची कसरत
गुढीपाडव्याच्या दिवशी शहरभर मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे आधीच वाहतुकीवर ताण आला असताना, मोदींच्या दौऱ्यामुळे तो आणखी वाढला. पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठ्या कसरती कराव्या लागल्या. नागरिकांना मात्र त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करावा लागला. हा दौरा फक्त राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा नव्हता, तर नागपूरकरांसाठीही एक संस्मरणीय दिवस ठरला.
