महाराष्ट्र

Rohit Pawar : कोटींचा दंड वाऱ्यावर उडाला, महसूलाचा विश्वास मेघामध्ये गुंतला

Megha Engineering : रोहित पवारांनी बावनकुळेंना कोंडीत पकडलं

Post View : 2

Author

मेघा इंजिनिअरिंगला दिलेल्या दंडमाफीवरून राज्यात राजकीय वादळ उठलं आहे. रोहित पवारांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विशेष सवलतींचा आरोप करत थेट हल्ला चढवला आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एकच तमाशा रंगलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चाणाक्ष आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मेघा इंजिनिअरिंगच्या ‘स्पेशल ट्रीटमेंट’वरून चांगलंच धारेवर धरलंय. सर्वसामान्य शेतकरी मुरूमाचा ढिगारा उचलला, तर महसूल खात्याचा दंड त्याच्या मागे धावतो, पण मेघा इंजिनिअरिंगला मात्र ‘बंपर डिस्काउंट’ आणि ‘डंपर रिटर्न’च्या आलिशान ऑफर. हा काय भलताच सौदा आहे, असा खोचक टोमणा पवारांनी लगावला आहे. या राजकीय नौटंकीने बावनकुळे यांच्या महसूल खात्याला जणू काही गालबोट लागलंय.

रोहित पवारांनी बावनकुळे यांच्या कारभाराला मेघाच्या मायाजालात अडकल्याचा आरोप करत, तब्बल 90 कोटींचा दंड माफ केल्याचा दणका दिला आहे. यावर बावनकुळे यांनी ‘आरोप सिद्ध करा, नाहीतर राजकीय सन्यास घ्या’ असा गाजावाजा केला होता. पण पवारांनी चपळाईने बावनकुळे यांच्याच विधिमंडळातील उत्तराला हत्यार बनवत, त्यांना स्वतःच्याच जाळ्यात अडकवलं. मेघा इंजिनिअरिंगला फक्त दंडात सवलतच नाही, तर अवैध उत्खननासाठी जप्त केलेली डंपर आणि यंत्रसामग्री परत करण्याचा ‘रिटर्न गिफ्ट’ देण्याचा सौदा झाल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केलाय.

Atul Londhe : मतचोरीच्या षडयंत्राला न्यायालयात खेचणार

पुराव्याचा पंचनामा 

पवारांनी आपल्या ट्विटर तोफेतून महसूल खात्याच्या ‘दो रंगी’ कारभारावर हल्ला चढवला आहे. गावातला शेतकरी रस्त्यासाठी मुरूम काढतो. तेव्हा महसूल खात्याचा ‘दंड’ त्याला चटकन गाठतो. पण मेघा इंजिनिअरिंगने अवैध उत्खनन केलं, तर त्यांना ‘बंपर डिस्काउंट’सह ‘डंपर रिटर्न’चा ताम्रपट. पवारांनी हा तमाशा उघड करताना, बावनकुळे यांच्या खात्याला ‘मेघा’च्या प्रेमात बुडालेलं ठरवलंय. सर्वसामान्यांना कारवाईचा चटका आणि धनदांडग्या कंपन्यांना सवलतींचा मेवा, हा काय प्रकार आहे, असा खुसखुशीत टोला त्यांनी लगावला आहे.

पवारांनी सातारा जिल्ह्यातील एका प्रकरणाला उजागर करत, मेघा इंजिनिअरिंगच्या ‘स्पेशल ट्रीटमेंट’चा पर्दाफाश केला. सातारा-म्हसवड रस्त्याच्या कामात कंपनीने अवैध उत्खनन केलं. तेव्हा स्थानिक तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी 105 कोटींचा दंड ठोकला. यंत्रसामग्री जप्त करून बँक खातंही सील केलं. पण, जून 2022 मध्ये सरकार बदलताच, डिसेंबर 2022 मध्ये मेघाला दंडमाफीचा ‘जॅकपॉट’ आणि जप्त सामग्रीचा ‘रिटर्न गिफ्ट’ मिळाला. पवारांनी हा सौदा उघड करत, महसूल खात्याचा मेघाशी असलेला ‘खास बॉण्ड’ कसला आहे, असा चिमटा काढला आहे.

Amravati Finance Fraud : महायुतीच्या बोलक्या भाताला यशोमती ठाकूरांचा टोला

रोहित पवारांनी बावनकुळे यांना त्यांच्याच विधिमंडळातील उत्तराचा ‘पंचनामा’ काढत, स्वतःच्या दाव्याला पुष्टी दिली. 11 जुलै 2025 रोजी बावनकुळे यांनीच विधानसभेत मेघाला दंडमाफी आणि जप्त सामग्री परत करण्याच्या आदेशाची माहिती दिल्याचा दावा पवारांनी केला. ‘स्वतःचेच आदेश विसरलात का?’ असा खोचक टोमणा मारत, त्यांनी बावनकुळे यांना कोंडीत पकडलं. सर्वसामान्य शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा आणि धनदांडग्या कंपन्यांना सवलतींचा मलिदा, असा हा दुटप्पी कारभार असल्याचा आरोप पवारांनी केला. या साऱ्या नाट्याने महसूल खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आता बावनकुळे यांचं उत्तर काय असेल, की हा तमाशा आणखी रंगणार? हा खेळ पाहायला महाराष्ट्र सज्ज आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!