महाराष्ट्र

Praful Patel : पालकमंत्र्यांची जबाबदारी फक्त झेंडावंदनापुरती नाही

Nagpur : प्रफुल पटेलांचे राष्ट्रवादी मंत्र्यांना खडेबोल

Author

विदर्भात येणारे मंत्री केवळ पर्यटनापुरते न येता खऱ्या अर्थाने जबाबदारी उचलावी, असा रोखठोक संदेश राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिला. चिंतन शिबिराच्या व्यासपीठावरून त्यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पक्षाच्या मंत्र्यांना खरमरीत ताकीद दिली आहे. विदर्भाला केवळ पर्यटनस्थळ समजू नका, तर जबाबदारीने कार्य करा, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. आज झालेल्या चिंतन शिबिरात त्यांनी मंत्र्यांच्या दिखाऊ भेटींवर ताशेरे ओढले. दोन तासांची हजेरी लावून मुंबईला परतणारी मंडळी विदर्भाच्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विदर्भाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना हात घालण्यासाठीच मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

महायुती सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी विदर्भात पालकमंत्री म्हणून नाममात्र भेटी देण्याऐवजी ठोस कामगिरी करावी, असे पटेल यांनी ठणकावले. पालकमंत्र्यांनी केवळ सणासुदीला झेंडावंदनासाठी येण्यापेक्षा स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विदर्भाच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या या परखड मतांनी पक्षांतर्गत आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Maharashtra : देवाभाऊ घेऊन येताहेत विकासाचे नवे युग

पालकमंत्र्यांची जबाबदारी

प्रफुल पटेल यांनी पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक जबाबदार राहण्याचे आवाहन केले. बुलढाणा, वाशिम, गोंदिया यांसारख्या जिल्ह्यांतील पालकमंत्र्यांनी केवळ औपचारिक भेटी देण्यापुरते मर्यादित न राहता कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सुचवले. मधल्या जिल्ह्यांमध्येही थांबून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंत्र्यांनी विदर्भाच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने पालकाची भूमिका निभावावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

Corporation Election : पक्षांतराच्या मायाजाळात ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार?

महायुतीतील राष्ट्रवादीच्या कमी जागांच्या वाट्यावरही पटेल यांनी भाष्य केले. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि आता महायुतीत भाजप मोठा भाऊ असल्याने जागा कमी मिळाल्या, परंतु विधानसभेत सहा जागा जिंकण्याचे यश लक्षणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. वाढत्या शहरीकरणामुळे मतदारसंघांचे स्वरूप बदलले असून, शहरी भागातील प्रश्नांचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि शहरी-ग्रामीण समस्यांचा समतोल साधण्यासाठी पक्षाने रणनीती आखावी, असे आवाहन त्यांनी केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!