महाराष्ट्र

Sanjay Raut : भाजपच कोरटकरला वाचवतय

Maharashtra : महाराजांचा अपमान करणाऱ्याला अभय

Author

भाजपच्या छायेखाली अपराध्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला संरक्षण मिळत असल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर गुन्हे दाखल होऊनही तो अजूनही मोकाट आहे. महाराष्ट्रातील सरकारला त्याला अटक करणे अशक्य आहे का, की त्याला भाजपकडून रक्षण दिले जात आहे, असा संताप आता जनतेत दिसून येत आहे. मध्य प्रदेशातील भाजप सरकारच्या छायेखाली कोरटकर सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावर आक्रमक होत भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्यात महापुरुषांच्या अपमानावरून आधीच वातावरण तापलेले असताना, कोरटकरच्या संरक्षणाचा मुद्दा सरकारसाठी अडचणीचा ठरत आहे. एका इतिहास अभ्यासकाला धमकी देणाऱ्या आणि महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कोरटकरविरोधात गुन्हा दाखल असूनही, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. यामुळे महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे.

Ashish Jaiswal : अर्थसंकल्प जनहिताचा, सामान्यांच्या सुविधांचा 

भाजपची भूमिका संशयास्पद

महाराष्ट्रात भाजपचे सरकार असताना कोरटकर फरार आहे. तो मध्य प्रदेशात आश्रय घेतो, आणि तिथेही भाजपचे सरकार असल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्याला कोणाचा पाठिंबा आहे? कोण त्याला वाचवत आहे? हे गंभीर प्रश्न समाजासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटानेही या मुद्द्यावर भाजपला धारेवर धरले आहे. कोरटकर जर सामान्य नागरिक असता, तर त्याला तुरुंगात टाकले असते, परंतु भाजपच्या संलग्नतेमुळे त्याला अभय दिले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

मराठा समाज आक्रमक

शिवराय आणि संभाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. विविध मराठा संघटनांनी कोरटकरच्या अटकेसाठी सरकारवर तीव्र दबाव टाकला आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांनी राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जर कोरटकरला त्वरित अटक झाली नाही, तर महाराष्ट्रभर प्रचंड जनआक्रोश उफाळून येईल. सरकारकडून केवळ आश्वासने मिळत आहेत, पण कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने मराठा समाज अधिक आक्रमक होत आहे.

Prashant Koratkar: राजे मुधोजी भोसले गडकरींच्या भेटीला

सरकार निष्क्रिय

भाजपची भूमिका या प्रकरणात संशयास्पद ठरत आहे. कोरटकरवर कारवाई करण्यासाठी सरकार खरोखरच गंभीर आहे, की तो भाजपच्या छायेखाली सुरक्षित आहे, महाराष्ट्राची जनता या प्रश्नांचे उत्तर मागत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांची भूमिका स्पष्ट होणार का, की सरकारचा संरक्षणाचा खेळ असाच सुरू राहणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!