महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : राजकीय पोळी भाजून घ्यायचा काँग्रेसचा प्रयत्न

Maharashtra Politics ; बालिशपणा, खोटेपणा अन् दडपशाही

Author

राहुल गांधींच्या निवडणूक आयोगाविरुद्ध केलेल्या बनावट मतदारांच्या आरोपांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

2024 हा वर्ष भारतीय राजकारणासाठी एका महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने काही ठिकाणी आश्चर्यकारक विजय मिळवला. ज्यामुळे त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही सत्ता मिळेल अशी आशा बळकट झाली होती. मात्र, या स्वप्नाला महायुती सरकारने जोरदार धक्का दिला आणि काँग्रेसला पुन्हा विरोधी बाकावर बसवले. पराभवाचा आघात अजूनही पचवू न शकल्यामुळे काँग्रेसने सोशल मिडीयावर सत्य नावाखाली अपूर्ण क्लिप्स आणि निवडक आरोपांच्या जोरावर राजकीय रंगमंचावर उतरले आहे.

अलीकडेच 7 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आणि भाजपवर ४० लाख बनावट मतदार नावांचा गंभीर आरोप केला. या आरोपांमुळे राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात वादळ उठले आहे. यावर महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले, जर मी निवडणूक आयोगाच्या बाजूने बोललो, तर लोक मला आयोगाचा वकील म्हणतील. पण सत्य हे आहे की आयोगाने राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे अनेकदा स्पष्ट उत्तर दिले आहे. बावनकुळे पुढे म्हणाले की, राहुल गांधी बालिशपणे वागत आहेत.

पारदर्शक धोरणांची गरज

स्वतःच्या पक्षाला वाचवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. कारण त्यांची पार्टी डूबणाऱ्या अवस्थेत आहे. त्यांचा तोडगा फक्त आरोप करून स्वतःच्या पक्षाला बचावण्याचा आहे. त्यांनी आरोप केला की, राहुल गांधी निवडणूक आयोगाला कटघरात उभे करून देशाच्या जनतेला भ्रामक माहिती देत आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतो. बावनकुळे यांनी याशिवाय राहुल गांधींवर गंभीर आरोप करत म्हटले की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान हे त्यांचे भक्कम पायाभूत आहे. पण राहुल गांधी आणि त्यांचे समर्थक त्याची बदनामी करण्यास मागे हटत नाहीत.

बावनकुळे यांनी जोर देत सांगितले की, त्यांचा राजकीय पोळी भाजून खोटे बोलून लोकांसमोर जायचा अंदाज हा त्यांचा जन्मसिद्ध स्वभाव बनला आहे. बावनकुळे म्हणाले, राहुल गांधींकडे काहीही उरलेले नाही. त्यामुळे ते केवळ बालिशपणा करत आहेत. देशाची, जनतेची आणि विकासाची समज त्यांना नाही. ते फक्त त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी लोकांना गोंधळात टाकत आहेत. बावनकुळे यांच्या मते, राजकारणात खोटेपणा आणि दुमडीबाजी करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करणे ही काँग्रेसची सध्याची रणनिती आहे. पण यामुळे त्यांना काहीही फायदा होणार नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, देश आणि लोकांच्या हितासाठी आपण योग्य आणि पारदर्शक धोरणांची गरज आहे. यासाठी काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. राजकारणात अशा वादळी वक्तव्यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये राजकीय ताप वाढवली आहे.

Parinay Fuke : आमदाराच्या सहवासात नवनिर्वाचितांना मिळाला अभिमानाचा आदर

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!