राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या युतीला भाजपकडून आक्षेप घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा उत्साह सध्या प्रचंड वाढत आहे. मात्र ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी राजकारणात तापले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना नवे तोंड आले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ एकत्र येण्याची शक्यता वाढत आहे. ज्यामुळे मराठी आणि हिंदू मतांचे विभाजन टाळता येईल, असा विश्वास काहींना वाटत आहे. मात्र, या एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये अचानक अडथळे उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेत ही शक्यता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर अशी चर्चा जोर धरू लागली की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार नाही. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या भेटीवर टीका करत भाजपवर आरोप केले की, भाजपला ठाकरे बंधूंचा एकत्र येणे परवडणार नाही म्हणून ते दोघांनाही एकत्र येऊ दिले जात नाही. यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील एकत्रिकरणाचा विचार स्वागतार्ह असल्याचे काँग्रेसचे विधान आहे. मात्र, भाजपने याला रोखण्यासाठी विविध प्रयत्न सुरू केले आहे.
Anil Deshmukh : फक्त सातबाराच नाही, फडणवीसांची आश्वासनंही ‘कोरी’च
ईडीची भीती
एकीकडे या भेटीमुळे राज ठाकरे यांच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे ईडीची भीती दाखवून राज ठाकरे यांना दूर ठेवले जाईल अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय संबंधांवर अनेक गहन प्रश्न उपस्थित झाले आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लष्करी यशाच्या प्रचारावर टीका केली आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भातील त्यांच्या विधानामुळे मोठा वाद उडाला आहे.
ऑपरेशन सिंदूर हा एक व्हिडीओ गेम आहे का? असा थेट सवाल पटोले यांनी उपस्थित केला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. यावर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी मत व्यक्त करत सांगितले की, ऑपरेशन सिंदूर झाल्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला हल्ल्याबाबत आगाऊ सांगितले होते, असे अनेकांमध्ये प्रश्न उपस्थित होतात. जर कोणीतरी हल्ला करायचा असेल तर ते आधी शत्रू राष्ट्राला कसे कळवू शकतो? याच मुद्द्यांवरून नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला. यात गैर काय आहे? अशा भाषेत त्यांनी आरोपांना फेटाळले.
Buldhana & Amravati : शिक्षण विभागाचं बॅक टू स्कूल मिशन सुरू
