राज ठाकरे यांच्या दीर्घकालीन शिलेदाराने भाजपमध्ये प्रवेश करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का दिला. ज्यामुळे राजकीय ब्रेकअप आणि पक्षातील विश्वासघाताची चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. पण या वाऱ्यांनी आता प्रेम आणि विश्वासघाताची एक नवी कहाणी रंगवली आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला आणि प्रत्येक पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केली. पण या सगळ्या धामधुमीत, राजकीय पक्षांमधील नेत्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याचे ‘ब्रेकअप’ आणि ‘नवे रिलेशनशिप’ यांचे नाट्य रंगत आहे. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हृदयाला एका विश्वासू शिलेदाराने जणू प्रेमात धोका दिल्याची भावना निर्माण केली आहे. त्यांच्या 20 वर्षांच्या जुन्या मित्राने त्यांना ‘वी आर जस्ट फ्रेंड’ असं म्हणत थेट भाजपशी ‘नवं नातं’ जोडलं आहे. या राजकीय प्रेमकहाणीत वैभव खेडेकर नावाचा हा ‘शिलेदार’ आता चर्चेचा विषय ठरला आहे.
कोकणात मनसेची पाळेमुळे रुजवणाऱ्या वैभव यांनी राज ठाकरे यांच्यासोबत दोन दशकांचा प्रवास केला. पण आता त्यांनी मनसेला राम राम ठोकत भाजपच्या मिठीत शरणागती पत्करली आहे. ही बातमी राज ठाकरे यांच्यासाठी जणू एखाद्या प्रियकराच्या विश्वासघातासारखी आहे. ‘गेलं, गेलं, माझं सगळं गेलं, वीस वर्षांचं प्रेम तुटलं’ अशी भावना राज ठाकरे यांच्या मनात दाटून आली असावी, असं राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. 5 जुलै 2025 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण आला, जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू तब्बल दोन दशकांनंतर एका मंचावर एकत्र आले. या भेटीने सर्वांना वाटलं की यंदाची महापालिका निवडणूक ठाकरे बंधूंच्या नावाने गाजतील आणि राजकीय रंगमंचावर ‘ठाकरे राज’ अवतरेल. पण राजकीय हवेचा अंदाज चुकला आणि महायुतीच्या भाजपने बाजी मारली.
Nagpur : सण साजरे होणार उत्साहात, कारण पोलीस गुन्हेगारील देणार मात
भाजप मोर्चेबांधणीत मग्न
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते आधीच भाजपच्या प्रेमजाळ्यात अडकत आहेत. आता राज ठाकरे यांच्याही मनसेतील विश्वासू सहकाऱ्याने त्यांना एकटं सोडले. वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाने राज ठाकरे यांच्या हृदयाला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी या ‘विश्वासघातकी’ सहकाऱ्याला पक्षातून हाकलून लावले. पण मनातलं दुखणं लपवता येत नाही. भाजपने आगामी निवडणुकींसाठी कोकणात आपली मोर्चेबांधणी ताकदीने सुरू केली आहे. चिपळूणचे उद्योजक प्रशांत यादव यांना नुकताच पक्षात प्रवेश देण्यात आला. यादव हे पूर्वी शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते. त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या विरोधात निवडणूकही लढवली होती. आता भाजपने दापोली-खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे.
खेडेकर हे मनसेचे कोकण संघटक आणि राज्य सरचिटणीस होते. त्यांनी 2014 मध्ये दापोलीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तरीही खेड नगरपरिषद निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या नव्या प्रेमकहाणीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि संपर्कमंत्री नितेश राणे यांनी हात दिल्याचे बोलले जात आहे. वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश हा राज ठाकरे यांच्यासाठी केवळ राजकीय धक्का नाही, तर एका जुन्या नात्याचा अंत आहे. खेडेकर यांनी मनसेसोबत दोन दशके काढली. खेडचे नगराध्यक्षपद भूषवले. पण आता त्यांनी नव्या राजकीय जोडीदाराची निवड केली आहे. या सगळ्या नाट्यामुळे कोकणातील राजकारणात नवी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्यासमोर आता नव्या जोशाने लढण्याचे आव्हान आहे. प्रेम तुटले असले तरी राजकीय लढाईत ते माघार घेणार नाहीत, हे नक्की. पण या नाट्यमय राजकारणात पुढे काय घडेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Political Drama : अरेच्चा! उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही घोळ
