महाराष्ट्र

Randhir Sawarkar : शेतकऱ्यांच्या आशेची निळकंठ सूतगिरणी पुन्हा कार्यान्वित

Akola : रणधीर सावरकरांचे अथक संघर्ष फळाला

Author

अकोल्याच्या मातीतून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा रुजवणारे रणधीर सावरकर, निळकंठ सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनातून विदर्भात समृद्धीची नवी पहाट घडवत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांनी सहकाराची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली आहे.

पश्चिम विदर्भाच्या कापूस उत्पादक मातीतून समृद्धीची नवी उमेद फुलवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दी निळकंठ सहकारी सूतगिरणी लि., अकोला, ही शेतकऱ्यांच्या आशेची ज्योत पुन्हा प्रज्वलित होण्यास सज्ज आहे. 1970 पासून 38 वर्षे अव्याहतपणे कापसाला मूल्यवर्धन देऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी ही संस्था काही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडली होती. मात्र, आमदार रणधीर सावरकर यांच्या अथक प्रयत्नांनी आणि महायुती शासनाच्या विकासाभिमुख दृष्टिकोनातून, विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, ही संस्था पुनर्स्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला. सावरकर यांनी शेतकऱ्यांचे हित आणि स्थानिक रोजगार निर्मिती यासाठी अविरत झटून, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली.

या निर्णयासाठी सावरकर यांनी खासदार आणि शेतकरी नेते संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात शासनाच्या सर्व स्तरांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मूल्यवर्धित भाव मिळावा, पश्चिम विदर्भातील उद्योगाला चालना मिळावी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला. या सामूहिक प्रयत्नांना यश मिळाले. 16 सप्टेंबरला मंत्रिमंडळाने 50:45:5 या विशेष तत्त्वावर सूतगिरणी पुनर्स्थापनेस मंजुरी दिली.

Birendra Saraf : स्थानिक निवडणुकींच्या तोंडावर महाधिवक्त्यांचा कायदेशीर रथ थांबला

शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी संकल्प

रणधीर सावरकर यांनी निळकंठ सहकारी सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी केवळ शासकीय कार्यालयांपर्यंतच मर्यादित न राहता, विधानसभेत प्रश्न, लक्षवेधी सूचना आणि चर्चा यांसारख्या प्रत्येक मंचाचा वापर केला. त्यांच्या या अथक प्रयत्नांना डॉ. रणजित सपकाळ आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष शिरीष धोत्रे यांनी सतत साथ दिली. युवा खासदार अनुप धोत्रे यांनीही या कार्यात आग्रही भूमिका घेत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. सावरकर यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानत, हा विजय सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या कार्याने शेतकऱ्यांच्या कष्टांना खऱ्या अर्थाने मूल्य प्राप्त होणार आहे.

Chandrashekhar Bawankule : बनावटपणाचा शिरकाव रोखणार सरकार 

निळकंठ सहकारी सूतगिरणीच्या पुनर्स्थापनेमुळे पश्चिम विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना केवळ आर्थिक स्थैर्यच मिळणार नाही, तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. ही संस्था 1970 मध्ये नानासाहेब सपकाळ यांच्या दूरदृष्टीने स्थापन झाली होती. ज्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकाराचे हे मॉडेल उभे केले. आता सावरकर यांच्या नेतृत्वात आणि महायुती शासनाच्या पाठबळाने, ही सूतगिरणी पुन्हा कार्यान्वित होत आहे. यामुळे कापसाचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक लाभ मिळेल. तसेच, स्थानिक उद्योगांना चालना मिळून पश्चिम विदर्भातील आर्थिक चक्र गतिमान होईल. सावरकर यांनी या यशाबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष आभार मानले, ज्यांनी या निर्णयाला गती दिली.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!