महाराष्ट्र

Ravikant Tupkar : नायकाच्या गाडीला धडक, अपघात की आखलेला घात?

Farmers Agitation : आंदोलनावरून परतत असताना घडली घटना 

Post View : 34

Author

शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आणि संघर्षाचं प्रतीक म्हणजे रविकांत तुपकर यांच्या गाडीला मध्यरात्री संशयास्पद धडक. ही अपघाताची घटना नव्हे, तर आवाज दाबण्याचा कट असल्याचा आरोप करत समर्थकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणारे, कर्जमुक्तीसाठी सरकारला धडकी भरवणारे शेतकऱ्यांसाठी नायक असलेले रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. तुपकर यांच्यावर मध्यरात्री ‘अपघाताच्या आडून’ जीवघेणा घाव? ही केवळ एक अपघाताची घटना नाही, तर मागे काहीतरी काळं सावट आहे का? असा प्रश्न अनेकांमध्ये आता उपस्थित होत आहे.

शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची लढाई संपवून रविकांत तुपकर जालन्याकडे परतीसाठी निघाले होते. यावेळी रवीकांत तुपकर यांच्या इनोव्हा गाडीला (MH-28-BQ-9999) पारगाव टोलनाक्याजवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (MH-44-YU-1444) जोरदार धडक दिली. ही घटना मध्यरात्री साडेबारा वाजता घडली. धडक इतकी भीषण होती की गाडीत बसलेले प्रवासी क्षणभरात फेकले गेले.

आंदोलनातून थेट थरकापात

तुपकर देवळा (बीड) येथे पार पडलेल्या आंदोलनानंतर समर्थकांसह जालन्याला निघाले होते. पारगाव टोलनाक्यावर गाडी काही क्षण विश्रांतीसाठी थांबवली असताना, मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यामध्ये रविकांत तुपकर, कार्तिक सवडतकर आणि राजाराम जाधव किरकोळ जखमी झाले. चालक अजय मालगे व गजानन नाईकवाडे सुखरूप असून, सर्वांचा थोडक्यात जीव वाचवला.

Buldhana : रात्रीच्या अंधारात वाळू तस्कर सुसाट 

रविकांत तुपकर यांनी स्वतः फेसबुक लाइव्ह व्हिडिओद्वारे अपघाताची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ट्रकचालक संभाजी विठ्ठल डोंगरे हा मद्यधुंद अवस्थेत होता आणि धडक दिल्यानंतरही तो गंभीर न होता उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे हा अपघात नसून पूर्वनियोजित घातपात असल्याचा गंभीर संशय तुपकर आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

घाबरवण्याचा प्रयत्न?

ज्या व्यक्तीने हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारला प्रश्न विचारले, त्या व्यक्तीवर असा हल्ला होतो हे नुसते योगायोग मानायचे का? हा अपघात की विरोधकांनी रचलेला कट? तुपकर समर्थकांनी या घटनेचा शेतकरी आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून तीव्र निषेध केला आहे आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे.

या घटनेनंतर वाशी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक आणि चालक पोलिसांच्या ताब्यात आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश घुले अपघात की घातपात? या कोनातून तपास करत आहेत. तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता नवा वळण घेणार का? त्यांच्या जिवावर उठणाऱ्या या प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर खळबळ उडाली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!