महाराष्ट्र

Ravinder Singal : भरकटलेल्या दिशेला पोलीस आयुक्तांनी दिलं सखोल वळण 

Nagpur : कायदा शिकविणाऱ्या हातांनी दिला जीवन पाठ; 

Author

नागपूरचे आयुक्त सिंगल यांचा एका भरकटलेल्या तरुणाला प्रेमळ सल्ला देत एकदा पुन्हा तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. रवींद्र सिंगल यांचं वडिलधारं मार्गदर्शन, फक्त कायदा-सुव्यवस्थेपुरतं मर्यादित नाही, तर आजच्या पिढीला जीवनाची दिशा दाखवणाऱ्या प्रेरणादायी नेतृत्वाचं मूर्तिमंत उदाहरण.

गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळणं, शहरात शिस्त आणि शांतता राखणं, पोलिस व्यवस्थेचा चेहरा अधिक विश्वासार्ह करणं, हे सर्व काही नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल गेल्या काही काळात अत्यंत यशस्वीपणे पार पाडत आहेत. परंतु, त्यांचं व्यक्तिमत्त्व केवळ कायद्याचा बडगा उचलणाऱ्या आयुक्ताचं नाही, तर ‘वडिलधाऱ्या व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शक’ आयुक्ताचं आहे. तक्रार निवारण दिनाच्या निमित्ताने त्यांनी अचानक हुडकेश्वर पोलीस ठाण्यावर भेट दिली. तिथे जे घडलं, ते माणुसकीच्या कडेलोटावर उभं असलेल्या एका तरुणाला आयुष्याची नवी दिशा दाखवणारा क्षण ठरला.

हुडकेश्वर परिसरातील आकाश नगरमधील शनिवारे कुटुंबाचा अल्पवयीन मुलगा अभ्यासाच्या दबावातून घर सोडून निघून गेला. त्याचा मोठा भाऊ वेदांत शनिवारे, जो पुण्यात संगणक शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे, त्याने अभ्यासावरून लहान भावाला थोडं कठोर शब्दांत दटावलं. भावाच्या मनावर त्याचा ताण आला आणि तो जेईईच्या तयारीच्या काळात घर सोडून निघून गेला. सायंकाळपर्यंत परत न आल्यामुळे चिंतेने व्याकुळ झालेलं कुटुंब पोलीस ठाण्यात पोहोचलं. पोलिसांनी अलर्ट देत क्षणात शोधमोहीम सुरू केली आणि मुलगा सुखरूप सापडला.

संवेदनशील पोलिस आयुक्त

पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल ठाण्यात दाखल झाल्याचं कळताच भावूक वेदांत थेट ठाण्यात आला. त्याने आयुक्त सिंगल यांना भावाला एकदा भेटण्याची विनंती केली. सिंगल यांनी ती विनंती लगेच स्वीकारली आणि मग झाला तो क्षण जेव्हा एका भरकटलेल्या मुलाला वडिलांसारखा आधार मिळाला. पोलिस आयुक्त सिंगल यांनी मुलाला जवळ घेत, त्याच्या खांद्यावर हात ठेवत खूपच आत्मीयतेने समजावत सांगितलं की, मोठा भाऊ रागावला म्हणून पळून जाणं हे उत्तर नाही बेटा. तू गुन्हेगारांच्या हातात सापडू शकतोस. लोक तुझा गैरफायदा घेऊ शकतात. बाहेरचं जग विचित्र आहे. पण घर हेच तुझं खऱ्या अर्थानं संरक्षण आहे. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. या शब्दांनी त्या मुलाचा आत्मविश्वास जागा झाला.

Harshwardhan Sapkal : शब्दांनी नाती बांधायची नाही, काँग्रेसला तत्त्वांचीच साथ हवी

माणुसकीची नोटीस

आजच्या धकाधकीच्या यंत्रवत युगात सिंगल यांसारखा एक अधिकारी, जो तक्रारींपलीकडे माणसाच्या भावनांना समजून घेतो, हे खरोखर दुर्मिळ आहे. नुसते गुन्हेगारीला रोखणं नव्हे, तर गुन्हे होऊच नयेत यासाठी मनांवर उपचार करणं, ही संकल्पना रवींद्र सिंगल आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणत आहेत. नागपूर पोलिस दलाच्या वतीने यासारखे उपक्रम हे फक्त कायद्याच्या रक्षणापुरते मर्यादित नाहीत. मुलांमध्ये नैराश्य, दबाव, तणाव वाढतो आहे, हे ओळखून पोलिस प्रशासनाकडून भावनिक समुपदेशनासारखे क्षण तयार होणं, ही काळाची गरज आहे. रवींद्र सिंगल यांनी ही गरज वाट न पाहता पूर्ण केली.

घरातून निघून गेलेला तो तरुण आता परत आलाय. पण तो फक्त घरात परतलेला नाही, तर अंतर्मुख होऊन आत्मशोधाच्या वाटेवर परतलेला आहे. त्याच्या मनात आयुष्याच्या प्रश्नांची उत्तरं आहेत आता आणि त्या उत्तरांची नोंद करून दिलीय एका पोलिस आयुक्तानं. पण हातात दंडुका घेऊन नव्हे, तर खांद्यावर हात ठेवून.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!