महाराष्ट्र

Rohit Pawar : निवडणूक आयोग म्हणजे गिरे तो भी टांगा ऊपर

Election Commission : रोहित पवारांचा मतदार याद्यातील गोंधळावरून सवालांचा मारा

Post View : 32

Author

लोकशाहीच्या आरशात धूळ फेकल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर थेट हल्ला चढवला आहे. मतदार याद्यांतील कथित गोंधळ, लाखो नावे वगळणे आणि ती यादी लपवण्याच्या भूमिकेवरून त्यांनी आयोगाला जाब विचारला.

निवडणूक हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. पण जर हाच उत्सव शंकेच्या सावटाखाली साजरा व्हायला लागला, तर लोकशाहीची पायाभरणीच डळमळायला लागते. सध्या नेमकं तेच घडतंय, असा जोरदार आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाला थेट धारेवर धरलं आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांतील कथित गैरप्रकार. लाखो मतदारांची अचानक वगळलेली नावे आणि त्या यादीचं सुप्रीम कोर्टातही न जाहीर करण्याचं आयोगाचं प्रतिज्ञापत्र. या सगळ्यावर रोहित पवार यांनी ‘खरपूस समाचार’ घेत आयोगाला तीक्ष्ण सवालांचा भडीमार केला आहे.

रोहित पवार यांनी सांगितलं, स्वायत्त संस्था असलेला निवडणूक आयोग कुणाच्याही मनाप्रमाणे वागायला नको. पाठीचा कणा असावा, निष्पक्ष असावं, हे अपेक्षित आहे. पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा उघडपणे पंचनामा केला तरी आयोग उलट त्यांच्याकडंच शपथपत्र मागतोय. हे म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ असं चित्र आहे. ते पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्यास आयोग बांधिल नाही असं सांगणं, हे नेमकं काय लपवण्याचा प्रयत्न आहे? आणि कोणासाठी? कुठे टी. एन. शेषन साहेबांचा काळ आणि कुठे आजचा आयोग, असा थेट टोला त्यांनी लगावला.

Parinay Fuke : गांधींच्या खोट्या आरोपांवर डॉ. फुकेंचा रिॲलिटी बॉम्ब

लोकशाहीला धोका ?

बिहारमध्ये आगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांतील फेरतपासणीमुळे मोठं राजकारण तापलं आहे. लाखो मतदारांची नावे अचानक वगळली गेल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर करून वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्यास आम्ही बांधिल नाही, अशी भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी या निर्णयावर कठोर टीका करत मतचोरीचे आरोप केले होते. त्याच आरोपांना पवार यांनी जोरदार पाठींबा देत, आयोगाच्या भूमिकेला लोकशाहीला धोका, असे संबोधले.

रोहित पवार इथेच थांबले नाहीत. त्यांनी भाजप व मनुवादी विचारसरणीवरही हल्ला चढवला. संविधान हटवणं हाच भाजप आणि मनुवादी विचारांचा खरा अजेंडा आहे. तिरंगा झेंडा, संविधानाची मुलभूत तत्वे यावर जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून जनमताची चाचपणी केली जाते. संत-शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा समता, मानवता व सामाजिक न्यायाचा विचार संपवण्यासाठी छुपा कट रचला जातो, असा त्यांचा आरोप.

Harshwardhan Sapkal : सत्ताधारी पक्षाने दंगा करू पथक स्थापन केले

कायम विरोध

वादग्रस्त ‘गुरुजी’ंवर टीका करत ते म्हणाले, अशा हजार पिढ्या जन्माला आल्या तरी संविधान संपवू शकणार नाहीत. सर्वसामान्य आणि महिलांच्या हक्कांना डावलणाऱ्या विचारसरणीला आमचा कायम विरोध राहील. संपूर्ण प्रकरणावर रोहित पवार यांचा सवाल सरळ आणि थेट, निवडणूक आयोग लोकशाहीचे रक्षणकर्ते आहेत की राजकीय अजेंड्याचे कारभारी? मतदार याद्यांतील फेरफार, निवडणुकीच्या तोंडावर होणारी नावे वगळण्याची मोहीम. ती यादी लपवण्याची तयारी, हे सगळं लोकशाहीसाठी धोक्याचं घंटानाद असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!