अकोला शहराला आज सामाजिक-सांस्कृतिक ऐक्याचा आणि विकासाचा नवा उजेड मिळाला आहे. मुस्लिम बहुल वस्तीतील ‘उर्दू घर’ स्थापनेस मंजुरी मिळाल्याने स्थानिक जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील जनजीवनात एक विशेष दिवस म्हणून नोंदवला जाणार आहे. शहराच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक वातावरणात नवे उजेड फूटले आहे. अकोल्याच्या भूतपूर्व विसरलेल्या भागांमध्ये राज्य सरकारने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. ज्यामुळे स्थानिक समाजाला नवीन दिशा मिळाली आहे. शहरातील मुस्लिम बहुल वस्तीतील ‘उर्दू घर’ यास मंजुरी मिळाली. यामुळे अकोल्यातील ऐक्य आणि सामाजिक सौहार्दाला नवे प्राण मिळाले आहेत.
अकोल्याच्या विकासासाठी आणि लोकहितासाठी आमदार साजिद खान पठाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश लाभले आहे. मुस्लिम बहुल वस्तीतील ‘उर्दू घर’ स्थापनेस मंजुरी मिळावी. यासाठी त्यांनी सभागृहात वारंवार मागणी केली आणि पाठपुरावा सुरू ठेवला. या निर्णयामुळे केवळ धार्मिक स्थळाचा दर्जा उंचावला नाही. तर स्थानिक समाजाला सांस्कृतिक गर्वाचा अनुभवही मिळाला आहे.
सांस्कृतिक ऐक्याचा संदेश
मुस्लिम बहुल वस्तीतील ‘उर्दू घर’ स्थापनेस मंजुरी मिळाल्याने अकोल्याच्या सामाजिक ऐक्यावर ठळक ठसा उमटला आहे. अल्पसंख्याक मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते या निर्णयाची घोषणा करण्यात आली. जी शहराच्या सांस्कृतिक विविधतेला उजागर करते. ऐक्याचे प्रतीक म्हणून या निर्णयाला स्थानिक जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. साजिद खान पठाण यांनी त्यांच्या निष्ठावान आणि लोकहितासाठी केलेल्या कार्यातून हे स्पष्ट केले आहे की, विकास आणि सामाजिक ऐक्य यासाठी सतत प्रयत्न करणारा नेताच खरा माणूस ठरतो. अकोल्यातील नागरिकांनी या घोषणेचे स्वागत करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार साजिद खान पठाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
Maharashtra : राज्यावर कोट्यवधींचं ओझं, पण लाडकींचे लाड सुरूच
अकोल्यासाठी हा दिवस सामाजिक ऐक्याच्या नव्या पर्वाचा प्रारंभ ठरतो. धार्मिक स्थळाचा दर्जा उंचावणे आणि भाषिक-सांस्कृतिक केंद्राची स्थापना. या दोन्ही गोष्टी शहराच्या विकासासाठी, सामाजिक सौहार्दासाठी आणि लोककल्याणासाठी मोठा बदल घडवणार आहेत. साजिद खान पठाण यांच्या अथक प्रयत्नांमुळे अकोल्याच्या सामाजिक व धार्मिक जीवनात एक नवा अध्याय सुरू झाला आहे जो शहराच्या भविष्याच्या विकासाची दिशा निश्चित करेल. स्थानिक समाजाला ऐक्य आणि प्रगतीच्या मार्गावर उभे राहण्यास मार्गदर्शन करेल.
