
भंडारा गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील आदिवासींची फसवणूक करणारा घोटाळेबाज पोलिसांच्या ताब्यात.
राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या गोष्टींचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे उकळले जात आहे. कधी ऑनलाईनच्या माध्यमातून तर कधी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यात देखील घडली आहे. 90 टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर मिळवून देऊ, असे सांगून आदिवासी आणि गैरआदिवासींची लाखो रुपयांनी फसवणूक केली आहे.
भंडाऱ्यात 90 टक्के सबसिडीवर ट्रॅक्टर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी बांधवांकडून एक लाख 30 हजार रुपये तर, गैरआदिवासींकडून तीन लाख रुपये घेवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणातील घोटाळेबाजाला पोलिसांनी अटक केली आहे.

नातेवाईकांसाठीच Bhandara मधील Job Scam बद्दल लोकप्रतिनिधी गप्प
सहा महिन्यांपासून होता फरार
8 ते 10 लाख रुपयांच्या किमतीचा ट्रॅक्टर 90 टक्के सबसिडीवर मिळवून देण्याच्या नावावर आदिवासी, गैरआदिवासींची लाखो रुपयांनी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. हे प्रकरण समोर येतात पोलिसांनी तातडीने घोटाळेबाजाचा शोध सुरू केला. फसवणूक करणाऱ्या घोटाळेबाजाच्या विरोधात तुमसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा घोटाळेबाज मागील सहा महिन्यांपासून फरार असल्याने पोलिस त्याच्या मागावर होते. भंडारा पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान केले आणि या घोटाळेबाजाला गडचिरोलीतून अटक करण्यात आली आहे.
भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात चिचोली येथे या घोटाळेबाजाने जय बिरसा ट्रायबल फार्मर प्रोड्युसर लिमिटेड नावानं कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून नागरिकांची कोट्यवधींनी फसवणूक केली आहे. सबसिडीवर ट्रॅक्टर मिळविण्यासाठी अनेक लोकांनी स्वतःचे त्यांचे गहाण ठेवलेत. अनेकांनी शेती विकल्या तर काहींनी कर्ज घेऊन या ट्रॅक्टरसाठी या कंपनीत पैसे गुंतविले होते. आता हा घोटाळेबाज पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.
वडिलांना साथ देणाऱ्यांच्या प्रेमाची परतफेड करण्याची Akash Fundkar यांना संधी
घोटाळेबाज निघाला उच्च शिक्षित
या घोटाळेबाजाने फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातचं नाही तर राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातही जाळे पसरवून ठेवले होते. तेथील आदिवासी नागरिकांचीही कोट्यवधींची फसगत केल्याची माहिती आता आता झाली आहे. मारोती अशोक नैताम (वय 35) असे घोटाळेबाज व्यक्तीचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जीमलगट्टा येथील रहिवाशी आहे. मारोती नैतामला हा एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे. मराठी, इंग्रजी, हिंदीसह एकूण नऊ भाषा या घोटाळेबाजाला बोलता येतात. त्यासोबतचं त्यानं स्वतःच्या नैताम या आडनावाचा गैरफायदा घेतला. नैताम हे आडनाव आदिवासींमध्ये आहे. परंतु हा ओबीसी (तेली) समाजाचा असतानाही त्यानं आदिवासी बांधवांना तो स्वतः आदिवासी असल्याचं सांगितलं आणि आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर घोटाळेबाजाने आदिवासींची फसवणूक केली. त्याची पुढील चौकशी भंडारा पोलिस करीत आहेत.