वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे आणि वागणुकीमुळे नेहमीच चर्चेत राहणारे व वादग्रस्त ठरलेले बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सध्या नाराज तर नाहीत ना? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उदयास आला आहे.
महाराष्ट्रातील राजकारण सध्या कोणत्याही नाट्याचे रंगमंच वाटायला लागले आहे. कोणीही समजून घेऊ शकत नाही की, पुढच्या काही तासांत कोणती नवीन भूमिका मांडली जाईल. कोणत्या आमदाराचा फोटो कोणत्या बॅनरवर दिसेल आणि कोणता राजकीय खेळ अचानक उलगडेल. हे सारे पाहताना असं वाटतं की, या नाट्याचा अगोदरचा अंक कुणालाही कळत नाही. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात गेल्या काही दिवसांत एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील आमदार निवासाच्या कँटिनमध्ये झालेल्या मारहाणीमुळे ते चर्चेत आले. पण आता त्यांचा एका बॅनरवरचा फोटो न बसवलेला प्रश्न राजकीय गप्पांमध्ये तापलेल्या वातावरणाला आणखी उष्णता देत आहे. शिंदे गटाच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे झालेल्या संवाद मेळाव्यात घडलेली एक विचित्र घटना राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू केली आहे. त्या बॅनरवर केवळ संजय गायकवाड आणि त्यांच्या मुलाचा फोटो दिसत होता. पण पक्षाचे नाव, शिवसेनेचे चिन्ह आणि सर्वात मोठं म्हणजे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मात्र अनुपस्थित होता.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्र्यांची क्लब भेट, मग भडकलेच ना पब्लिक थेट
पक्ष नियमांची खिल्ली
शिवसेना पक्षाच्या नियमांनुसार अशा कोणत्याही अधिकृत कार्यक्रमात पक्षप्रमुख आणि पक्ष चिन्हाचा फोटो असणे अनिवार्य असतो, पण इथे या नियमाची पूर्णपणे खिल्ली उडवली गेली. राजकीय वर्तुळात या घटनेने संजय गायकवाड यांच्या नाराजीबाबत चर्चेला जीव मिळवून दिला आहे. कारण ही भूमिका पक्षातील अंतर्गत मतभेदांचे द्योतक आहे असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी आम्हाला दिलेल्या थेट उत्तराऐवजी वेळ वाया घालवणारा आणि पक्ष प्रमुखांविषयी आदर व्यक्त करणारा शब्दप्रयोग यामुळे तिथल्या राजकीय वादांना अधिक बळ मिळाले आहे.
मुंबईत महापालिका निवडणूक जवळ येत असताना, शिंदे गटाकडून अजूनही कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही. अनेक पदाधिकाऱ्यांना कोणतीही जबाबदारी मिळालेली नाही. ज्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम वाढत आहे. मुंबईतील शिवसेनेच्या जुन्या कार्यकारिणीला रद्द केल्यापासून आठ महिने उलटले तरीही नव्या कार्यकारिणीच्या घोषणेला उशीर होत आहे. या परिस्थितीत, बॅनरवर फक्त गायकवाडांचा फोटो दिसणे म्हणजे मुंबईतील वर्तुळातील पदाधिकाऱ्यांच्या असंतोषाचे प्रतिबिंब आहे. मुंबईतील नेत्यांवर जबाबदारी न दिल्यामुळे अनेक पदाधिकारी पक्षाकडे लक्ष न देता स्वत:च्या हितासाठी संघर्ष करत असल्याचा आरोपही उठत आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र येणं आणि त्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून दिसणारा संथ कारभार या राजकीय खेळात ताण वाढवत आहे.
Amol Mitkari : मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे दादांच्या आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे धाव
