महाराष्ट्र

Shiv Sena : तीन दिवसात धनुष्यबाणात दिसणार मोठे बदल

Eknath Shinde : काहींचा पक्ष प्रवेश; जबाबदारीत बदल

Post View : 40

Author

द लोकहित लाईव्ह – सर्व बातम्या पाठपुरावा करून, पुराव्यानिशी आणि संपूर्ण माहिती मिळवूनच लिहिल्या जातात.

शिवसेना स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटात राज्यभरात मोठे संघटनात्मक बदल होणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीसाठी शिंदे गट आक्रमक पावले उचलत आहे.

19 जूनला शिवसेनेचा स्थापना दिवस आहे. या स्थापना दिनाच्या निमित्ताने आणि आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेत व्यापक संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत. शिवसेनाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील यादी फायनल केली आहे.

त्यामुळे पुढील तीन दिवसांमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये राज्यभरात मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. या घडामोडी घडण्यापूर्वी राज्यभरातून शिवसेनेचे अनेक नेते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. प्रत्येकाला एकच ओढ लागली आहे ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची. एकनाथ शिंदे यांची भेट शक्य नसेल तर अनेक नेते त्यांचे सुपुत्र तथा सेकंड इनकमंड खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यासाठी चढाओढ करत आहेत. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेत व्यापक संघटनात्मक फेरबदल बघायला मिळणार आहेत. नागपूर मध्ये जिल्हाप्रमुखपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्यातील एक नाव शिंदे यांनी फायनल केले आहे, त्याची अधिकृत घोषणा केवळ बाकी आहे.

घडामोडींकडे लक्ष

अकोल्यातील शिवसेनेचा तिढा सोडविण्यासाठी नवीन संपर्कप्रमुख नेमण्यात येणार आहे. बुलढाणा, अमरावती, वर्धा, रामटेक यवतमाळ आणि वाशिम या भागांमध्ये शिवसेनेच संघटनात्मक बळ कसं मजबूत करता येईल, यासाठी व्यापक बदल करण्यात येणार आहेत. यवतमाळ मध्ये शिवसेनेचा चेहरा म्हणून विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्याकडे पाहिले जाते. मात्र यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भावना गवळी यांना विरोध झाल्याने शिवसेनेला दुसऱ्या जिल्ह्यातून उमेदवार यवतमाळ – वाशिम मतदार संघात आणावा लागला. त्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये कोणती घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

बुलढाणा मध्ये प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड हे शिवसेनेचा चेहरा आहेत. अकोल्यामध्ये शिवसेनेत गटबाजी सुरू आहे. गोपीकिशन बाजोरिया यांना विरोध आहे. त्यामुळे प्रतापराव जाधव आणि गोपीकिशन बाजोरिया यांना कोणती जबाबदारी दिली जाणार, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. अमरावती मध्ये अडसूळ पिता – पुत्र आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांना कोणती जबाबदारी मिळणार आणि महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचं किती प्राबल्य दिसणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.

Ashish Deshmukh : आमदारांच्या आग्रहाने मोहपाची नव्याने नकाशा क्रांती 

निवडणूक जिंकण्याचा निर्धार

रामटेकमध्ये सद्यस्थितीत शिवसेनेची स्थिती मजबूत आहे. नागपूर मध्ये नवीन जिल्हाप्रमुख नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याशिवाय राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेसाठी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवायचे असेल तर मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवलीच पाहिजे, अशा तयारीत सध्या एकनाथ शिंदे गट आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट सर्वात आघाडीवर आहे. त्यामध्ये ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर या महापालिकांमध्येही जास्तीत जास्त नगरसेवक विजयी व्हावे यासाठी शिवसेना शिंदे गट व्यापक प्रमाणावर संघटनात्मक बदल करताना दिसणार आहे.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!