
भंडारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ‘क्लीन स्वीप’ केला आहे. भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. फुके यांच्या मॅजिकच्या जोरावर भाजपची संघटना अजून मजबूत झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात आज भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ‘क्लीन स्वीप’ केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा नेत्यांनी भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या करिश्म्याच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश केला. भाजपच्या संघटनात्मक विस्ताराच्या विमानाला लागलेले ‘टर्बो इंजिन’ थांबायचं नाव घेत नाही. विमानाचे स्टिअरिंगवर आहे एक जबरदस्त पायलट डॉ. परिणय फुके.
बेला (भंडारा) येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या या भव्य प्रवेश कार्यक्रमात पक्षाचा जोश, कार्यकर्त्यांचा ठोस आणि उपस्थित नेत्यांचा हशा, सगळं काही ‘हाऊसफुल्ल’ होतं. एकदा फुके साहेब भेटले, की मग थेट भाजपात एन्ट्री, अशा प्रतिक्रिया आता गावोगावी ऐकायला मिळतात. डॉ. परिणय फुके यांचं संघटन कौशल्य, नेतृत्वातील स्पष्टता आणि कार्यकर्त्यांशी नातं जोडण्याची शैली म्हणजे भाजपसाठी एक ‘सीक्रेट वेपन’च ठरत आहे. त्यांचे आतापर्यंतचे योगदान पाहता भंडाऱ्यात ‘फुके मॅजिक’ सुरू आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

नावही होईल गायब
उद्धव ठाकरे गटाचा भाजपात प्रवेश हा काही पहिला प्रसंग नाही. याआधीही उद्धव ठाकरे गटाचे अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते डॉ. फुके यांच्या नेतृत्वात भाजपात सामील झाले आहेत. भविष्यात एखाद्या वेळी असे व्हायला नको, जर भंडाऱ्यात शिवसेनेचा पत्ता विचारला तर लोकच उलट विचारतील कुठली शिवसेना? जुनी की भाजपात गेलेली? असंच चालू राहिलं, तर उद्धव ठाकरे गटाचं नावच भंडाऱ्यातून गायब होऊन जाईल, असं म्हटल्यास देखील चुकीचं ठरणार नाही.
आजच्या प्रवेशाने तालुका व जिल्हा पातळीवरील भाजपा संघटन अधिक मजबूत झालं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, नव्या नेतृत्वाचा आत्मविश्वास आणि पक्षाच्या धोरणांवर असलेला विश्वास, हे सगळं एकत्र पाहायला मिळालं. यामागे देवेंद्र फडणवीस यांचे विकासाभिमुख नेतृत्व आणि डॉ. परिणय फुके यांचे उत्साही मार्गदर्शन आहे, हे वेगळं सांगायला नको.
या विशेष प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री चैतुजी उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य विनोदजी बांते, माजी उपसभापती प्रशांत खोब्रागडे आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली. शेवटी एवढंच, भाजपा हा फक्त निवडणुकीचा पक्ष नसून, तो एक ‘जनतेचा जोडीदार’ आहे. डॉ. परिणय फुके हे त्या ‘जोडीदार’पैकी सगळ्यात लोकप्रिय कॅप्टन बनले आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.