यवतमाळच्या सामाजिक रणांगणात आज सन्मान, संकल्प आणि नव्या उमेदेची महायात्रा सुरू झाली. पालकमंत्री संजय राठोडांच्या नेतृत्वाखाली सेवाभावी हातांना नवा वेग आणि विकासाचा निर्धार मिळाला.
यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात वातावरण वेगळंच होतं. सन्मान, कृतज्ञता आणि नव्या आशांचा संगम घडवणारी एक बैठक सुरू होती. या बैठकीचं नेतृत्व करत होते यवतमाळचे पालकमंत्री आणि मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड. ज्यांच्या शब्दांमध्ये केवळ आश्वासन नव्हे, तर कृतीची हमी दडली होती.
ही बैठक फक्त सामाजिक संस्थांच्या गौरवासाठी नव्हती, तर ती होती सामाजिक विकासाच्या नवी दृष्टीकोनासाठी. संजय राठोड यांनी सुरुवातीपासूनच स्पष्ट केलं की, शासन आणि सेवाभावी संस्थांची सांगड घातली, तर ग्रामीण भागातील जीवनमान बदलू शकतं. आणि हा बदल करण्यासाठी मी स्वतः पुढे आहे.
Chandrashekhar Bawankule : बहिणींच्या गुल्लकात भर, शेतकऱ्यांच्या कर्जात उणिव
व्यसनमुक्ती मोहीमांना वेग
बैठकीत ठरलं की, ग्रामीण भागातील जनजागृती उपक्रमांना आता अधिक विस्तार दिला जाईल. महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या नव्या संधी मिळतील. मानसिक आरोग्य सेवा फक्त शहरापुरती मर्यादित न राहता खेड्यापाड्यांत पोहोचेल. व्यसनमुक्ती मोहिमांना नवा वेग मिळेल आणि पुनर्वसन केंद्रांची क्षमता दुप्पट करण्यासाठी थेट पावलं उचलली जातील.
सन्मानित झालेल्या संस्था जणू समाजसेवेच्या मशालीच आहेत. नेर येथील नवजीवन वृद्धाश्रम, सत्यनारायण अमोलकचंदजी भूत वृद्धाश्रम, नंददीप फाउंडेशन (बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, यवतमाळ), सावीत्रीच्या लेकी. मातोश्री वृद्धाश्रम, ग्रामीण भक्ती ट्रस्ट, सेवा, समर्पण प्रतिष्ठान, निस्वार्थी सेवा फाऊंडेशन, ओवी फाऊंडेशन, दिवंगत सुशीलाबाई नागपुरे वृद्धाश्रम. दीनदयाल सेवा प्रतिष्ठान, रोटरी क्लब यवतमाळ, तेजस्विनी सेवा समिती. यांच्या कार्याचा गौरव करताना सभागृहात टाळ्यांचा आवाज घुमत होता.
Ravi Rana : शरद पवारांचा पुढचा थांबा थेट पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट मध्ये
चर्चा नाही, कृती होणार
उपस्थित प्रतिनिधींनी शासनाकडून आवश्यक मदतीच्या मागण्या केल्या. तेव्हा संजय राठोड यांनी एक क्षणही विलंब न करता स्पष्ट शब्दांत हमी दिली की, तुमच्या पुढील विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तुमच्या लढ्याला बळ देणं ही माझी जबाबदारी आहे. ही वाक्यं ऐकताच संस्थांच्या चेहऱ्यावर नवा आत्मविश्वास झळकला. आता केवळ चर्चा नाही, तर कृती होणार, अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली.
या बैठकीमुळे जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रात नवा टप्पा सुरू होणार हे निश्चित आहे. कारण यानंतर ग्रामीण भागातील महिला स्वावलंबनाकडे वाटचाल करतील, व्यसनमुक्त समाजाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, मानसिक आरोग्याच्या सेवा सहज उपलब्ध होतील आणि वृद्धाश्रम, पुनर्वसन केंद्र यांसारख्या सुविधा अधिक सक्षम होतील.