सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या लष्करावरील विधानावर कठोर ताशेरे ओढले असून, तुमचे व्यासपीठ संसद आहे, ट्विटर नव्हे, असा इशारा दिला.
देशातील सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा लोकशाहीतील वक्तव्यांच्या जबाबदारीचे महत्व स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना कोर्टाने दिलेल्या तंबीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना सुप्रीम कोर्टाने कडक आणि थेट शब्दांत सुनावले आहे. कोर्टाने स्पष्टपणे म्हटले, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. तुमचे व्यासपीठ हे संसद आहे, ट्विटर नव्हे. एका लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा अधिकार असला, तरी त्याला जबाबदारीची जोड हवी, हा या सुनावणीचा केंद्रबिंदू ठरला.
राहुल गांधींनी 2022 मध्ये चीनने भारताचा 2 हजार चौरस किलोमीटर भूभाग बळकावल्याचा दावा करत भारतीय लष्करावर केलेली टिप्पणी न्यायालयाच्या दृष्टीने गंभीर आणि दुर्भाग्यपूर्ण होती. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून राहुल गांधींवर घणाघात करत, त्यांचे वक्तव्य अक्षम्य, देशद्रोही आणि लष्कराच्या मनोबलावर घाला घालणारे असल्याचे स्पष्टपणे सांगितले. देशाची बदनामी करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने योग्य जागा दाखवली. ही तंबी फक्त एक नेत्याला नव्हे, तर सगळ्या राजकीय व्यवस्थेला दिलेला इशारा आहे, असं ते म्हणाले.
Chandrapur BJP : कार्यकारिणीच्या कलहामुळे उमटला भावनिक विदाईचा सूर
जबाबदारीची आठवण कोर्टाकडून
बावनकुळे पुढे म्हणाले, जर राहुल गांधी खरे भारतीय असते, तर त्यांनी असं वक्तव्य केलंच नसतं. त्यांच्या तोंडून अशा देशविरोधी भावना व्यक्त होणे ही चिंतेची बाब आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना स्वार्थी राजकारणासाठी भारतीय सैन्याचा अपमान केल्याबद्दल जाब विचारताच, बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया देत, हा केवळ गुन्हा नव्हे, तर पाप आहे, असे तीव्र शब्द वापरले. त्यांनी स्पष्ट केले की, आपल्या राजकीय फायद्यासाठी शत्रू राष्ट्रांना संधी मिळेल, अशी वक्तव्य करणे हे देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहे. भारतीय लष्करावर अविश्वास टाकणे म्हणजे देशाच्या मुळावर घाव आहे.
बावनकुळे यांनी राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, आज भारताच्या लोकसभेत जो विरोधी पक्षनेता आहे, त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याची वेळ सर्वोच्च न्यायालयावर आली आहे, हे खरोखरच दुर्दैव आहे. राहुल गांधी यांचं वर्तन हे काँग्रेसच्या पतनाचे कारण ठरत आहे. त्यांच्या अशोभनीय, सवंग आणि संतापजनक वक्तव्यांमुळेच देशाच्या नागरिकांनी त्यांना नाकारले आहे. ज्या खुर्चीत तुम्ही बसलेले आहात, तिथे अनेक थोर व्यक्तिमत्वे बसली होती. त्या पदाची प्रतिष्ठा राखणे तुमचे कर्तव्य आहे. ती वाढवू शकत नसाल, तरी अपमान मात्र होऊ देऊ नका, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला.
Amravati : नौटंकी म्हणणाऱ्या महसूल मंत्र्यांचा प्रहारने केला जाहीर निषेध