प्रशासन

Sand Mafia : शासकीय अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ

Akola : वाळू माफियांच्या दहशतीचा विकराळ चेहरा

Share:

Author

अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नायब तहसीलदारांना धमकी देण्याची गंभीर घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्यामुळे माफियांनी अश्लील शिवीगाळ करत शासकीय वाहन पेटवण्याची धमकी दिली.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. त्यानंतर तहसीलदार बळीराम चव्हाण यांना अश्लील व जातीवाचक शिवीगाळ करत, शासकीय वाहन पेटवून देण्याची धमकी देण्यात आली. या गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे.

प्रहारचे माजी पदाधिकारी अरविंद पाटील व सचिन निमकाळे यांच्यासह तिघांविरुद्ध पातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या घटना प्रशासनाच्या कार्यक्षमतेला थेट आव्हान देणाऱ्या आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतात.

Nagpur : संघटना एकवटल्या, संताप उसळला

अडथळ्यांची पोलिस चौकशी

नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी अरविंद पाटील यांच्या ओळखीतील व्यक्तीच्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती. या कारवाईचा सूड उगवत पाटील यांनी थेट नायब तहसीलदारांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत अश्लील व जातीवाचक शिवीगाळ केली. इतक्यावरच न थांबता, शासकीय वाहन पेटवून देण्याची उघड धमकीही दिली. या संभाषणाची ध्वनिफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पातूर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत अरविंद पाटील, सचिन निमकाळे व अन्य तिघांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम तपास करत आहेत.

Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप

सडेतोड प्रतिसाद

राज्यात अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खननाचा विळखा घट्ट होत चालला आहे. या काळ्या धंद्याला आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभाग संयुक्तपणे विशेष मोहिम राबवत आहेत. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वाळू माफिया प्रशासनाच्या कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांना धमकावत आहेत, हे चिंतेचे लक्षण मानले जात आहे.

पातूरमधील या घटनेनंतर महसूल व पोलीस अधिकारी अधिक सतर्क झाले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना तत्काळ रोखण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता व कायद्याचा आदर राखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Nagpur : रेल्वेगाड्या धावणार आता अधिक विश्वासाने

कडक पावले अपेक्षित

नायब तहसीलदारांवर झालेल्या या गंभीर प्रकारानंतर राज्य शासनाकडून याप्रकरणी कडक भूमिका घेण्याची शक्यता आहे. महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही आता नव्याने विचार केला जात आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनस्तरावर उपाययोजना केली जात आहेत.

वाढत्या गुन्हेगारी, वाळू माफियांचा उच्छाद, आणि अधिकाऱ्यांवरील थेट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण संपूर्ण राज्यातील यंत्रणेसाठी सावधतेचा इशारा आहे. अरविंद पाटील, सचिन निमकाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन इतरांना धडा शिकवण्याची अपेक्षा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!