प्रशासन

Nagpur Traffic : अपघात कमी झाले हो… अब्रु वाचविण्यासाठी DCP झाले PRO

Devendra Fadnavis : लोकप्रतिनिधींचे देवाभाऊंच्या गावाकडे दुर्लक्ष

Post View : 64041

Author

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गाव नागपूर. देशभरात डंका गाजविणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या गावातील वाहतूक व्यवस्था फुस्स झाली आहे.

चमकोगिरी, दिखावटी काम आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात सध्या नागपूर शहर पोलिस दलातील वाहतूक नियंत्रण विभाग अडकला आहे. काहीही नवीन न केल्यानं शहर वाहतूक विभाग वादात सापडला आहे. दररोज तीन ते चार हजार ‘ब्रेथ अॅनलाइजर टेस्ट’ केल्याचा दावा करणाऱ्या वाहतूक शाखेच्या फोकनाड दाव्यांची पोलखोल होत आहे. शहरातील वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. रुग्णवाहिकांना मार्ग सापडत नाही. चौकात वाहतूक पोलिस दिसत नाहीत. अपघातांची संख्या वाढत आहे. अशात वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी आपल्या विभागाची इज्जत वाजविण्यासाठी पुढे आले आहेत.

नागपूर शहर पोलिस दलाची प्रत्येक बातमी प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचावी यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी मीडिया सेल सुरू केला आहे. शहरातील प्रत्येक डीसीपी जनसंपर्क अधिकाऱ्यामार्फत प्रसार माध्यमांशी संवाद साधतो. परंतु लोहित मतानी यांनी डीसीपीचं काम सोडून एक पोलिस निरीक्षक दर्जाचं पीआरओचं काम करावं लागत आहे. कदाचित नागपूर पोलिस दलातील पीआरओ त्यांचे ऐकत नसावे म्हणून त्यांना आता स्वत: आपला विभाग काय काम करत आहे, हे सांगण्याची गरज भासत आहे.

Akola Police : नागपूर पोलिसांना जमलं नाही ते करून दाखवलं

देवाभाऊ लक्ष द्या

अर्चित चांडक यांच्या बदलीनंतर नागपूर शहर पोलिस दलात नवीन असं काहीच झालेलं नाही. शहर वाहतूक पोलिस केवळ चमकोगिरी करीत असल्याचं सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील लोक अनेक तास ‘ट्रॅफिक जाम’मध्ये अडकून पडत आहेत. कोणता मार्ग धरावा म्हणजे ऑफीस किंवा घरी लवकर पोहचू असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. मात्र त्यानंतरही ‘ग्राऊंडलेव्हल’ला ‘झिरो’ काम असलेला वाहतूक विभाग आपल्या कौतुकाचं ढोल आपल्याच हातानं बडवून घेत आहे.

सोशल मीडियावर दररोज नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगणारे व्हिडीओ ‘व्हायरल’ होत आहेत. अशात वाहतूक विभागातील अधिकारी प्रोटोकॉल मोडण्यात धन्यता मानत आहे. चांगल्या पोस्टिंगसाठी हे अधिकारी पोलिस दलातील शीस्त मोडत थेट मंत्र्यांना भेटत आहेत.

Nagpur Police : सिंगल साहेब कळलं का? एकच डीसीपी अंगार, बाकी भंगार

इंग्रजीची मदत

वाहतूक पोलिस विभागाचे अधिकारी अशा अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. उपायुक्त लोहित मतानी मात्र असे अधिकारी नाहीत. परंतु हाताखालचे अधिकारी, कर्मचारी काम करीत नाहीत. अशात मतानी यांनाच आपल्या विभागासाठी डीसीपी सोडून पीआरओचं काम करावं लागत असल्याबद्दल अधिकारी वर्गात चिंता, खंत आणि संताप व्यक्त होत आहे.

शहर वाहतूक पोलिस विभागानं आपल्या विभागातून वेगळ्या प्रेसनोट काढणं सुरू केलं आहे. यासाठी प्रसार माध्यमातील काही लोकांनी मदत घेतल जात आहे. इंग्रजीवर प्रभुत्व असलेले लोक वाहतूक शाखेतील काही साहेबांना खुश करण्यासाठी दिवसरात्र वाहतूक शाखेचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र या कोणत्याही गोष्टीची कल्पनाच लोहित मतानी यांना नसल्याचं आता पुढं येत आहे. हाताखालचे अधिकारी देखील मतानी यांना कुठून इंग्रजीतून बातम्या तयार करून मिळत आहे, हे सांगत नाही. त्यामुळं अधिकाऱ्यांच्या कृतीमुळं नागपूर शहर वाहतूक शाखेवर आता चौफेर टीका सुरू झाली आहे.

IPS Transfer : राज्य पोलिस दलात लवकरच फेरबदल

अधिवेशनात मुद्दा

वाहतूक शाखेसोबतच लोहित मतानी यांच्याकडे सायबर विभागाची देखील जबाबदारी आहे. ट्रॅफिक विभागाइतकेच सायबरचे कामही प्रचंड तणावाचे आहे. दररोज जितके वाहतूक विषयक गुन्हे घडतात, तितकेच सायबर गु्न्हेही घडत आहेत. मात्र गृह विभागानं कामाचा प्रचंड ताण डीसीपी लोहित मतानी यांच्यावर लादणे सुरू केले आहे. त्यामुळे वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावातच अन्याय होत असल्याची अधिकाऱ्यांची भावना आहे.

नागपूर शहराच्या वाहतूक व्यवस्थेकडे शहरातील आमदारांचे दुर्लक्ष आहे. आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते हे सत्ताधारी आमदार शहरात आहेत. आमदार अभिजित वंजारी, विकास ठाकरे, नितीन राऊत हे काँग्रेसचे आमदार विरोधी बाकांवर आहेत. परंतु त्यानंतरही वाहतूक व्यवस्था भंगारापेक्षाही भंगार का होत आहे, याचा जाब विचारायला कोणीही तयार नाही. कदाचित राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात तरी हा मुद्दा उचलला जावा, अशी सगळ्यांची अपेक्षा आहे.

IPS Transfer : कर्तबगार एसपींच्या बदलीची चर्चा आलीच कुठुन?

गाव कोणाचं?

शहरातील वाहतूक व्यवस्था सुतासारखी सरळ करायची आहे. त्यासाठी लोहित मतानी स्वत:च ‘फिल्ड’वर उतरले आहेत. स्वत: काम करीत असल्याचे फोटो ते स्व:तच नागपूर शहर पोलिस दलाच्या मीडिया ग्रुपमध्ये टाकत असतात. यावरून त्यांना नागपूर शहर वाहतूक शाखेच्याच नव्हे तर पीआरओ विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही सहकार्य मिळत नसल्याचं दिसत आहे.

डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला एका पीआय दर्जाचं काम करावं लागणं हे नक्कीच नागपूर शहर पोलिस दलासाठी चांगलं नाही. त्यामुळं देवाभाऊ आता तुम्ही ट्रॅफिकसाठी काही तरी मार्ग शोधा. अन्यथा आपल्यालाच वाहतूक विभागातील कर्तबगार अधिकारी हाती शिटी आणि काठी घेऊन रस्त्यावर उतरायला लावतात की काय, अशी वेळ आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. अधिकारी काय येतात आणि लगेचच पोस्टिंग घेऊन निघून जातात. पण गाव कुणाचं आहे, आपलं की अधिकाऱ्यांचं याचा विचार लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं आहे. शेवटी Do What You Like पेक्षा Do What Is Right हे मुख्यमंत्र्यांनीही ध्यानात घ्यावं.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!