महाराष्ट्र

NCP Politics : महाविकास आघाडीचा ‘लिकेज प्रॉब्लेम’ गंभीर 

Mahayuti : काँग्रेसला बसत आहे धक्क्यावर धक्का

Post View : 15

Author

महाविकास आघाडीची गळती थांबायचं नाव घेत नाही. अनेक नेते महाविकास आघाडीला राम राम ठोकत आहेत. अशात काँग्रेसला पुन्हा धक्का बसणार आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून कित्येक महिने उलटले तरी महाविकास आघाडीच्या ‘हृदयविकाराच्या झटक्यांना’ काही विश्रांती मिळताना दिसत नाही. रोज उठल्यावर एखादं नवं नाव महायुतीच्या ‘इन्कमिंग’ यादीत सामील झालं नाही, तरच नवल! उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांना कुणी ‘धक्का दिला नाही का आज?’ असा संशयच यावा, इतकी अवस्था झाली आहे.

महाविकास आघाडीला सध्या ‘झोपी जाताना एखादा नेता बाजूने निघून गेला तर?’ अशी चिंता झोप उडवणारी ठरतेय. नुकतेच भाजपनं 132 जागा पटकावल्या आणि महायुतीने तब्बल 232 जागांवर दणक्यात विजय मिळवला. पण महाविकास आघाडीच्या पदरी फक्त 46 जागा आल्या. त्यातही नेत्यांचा ‘उलटा प्रवास’ सुरू असल्याने त्यांच्या हताश चेहऱ्यांना बघून कुणालाही करुणा यावी.

Chandrapur : नावाप्रमाणेच ‘चंद्र’पूर देत आहे मूनवॉकचा अनुभव 

घर होतंय रिकाम

आता राजकीय वर्तुळातून नवी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दोन मोठे चेहरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, तसेच मीनल खतगावकर हे दोघे थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादांच्या गटात ‘एन्ट्री’ घेणार आहेत. 23 मार्च रोजी नरसीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा ‘पक्षप्रवेश महोत्सव’ होणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि इतर अनेक वरिष्ठ नेते देखील सोहळ्यास रंगत आणणार आहेत. असे वाटतेय, काँग्रेसच्या दारावर मोठा फलक लावायला हवा. “सावध! घर रिकामं होत आहे, इच्छुक उमेदवारांनी लगेच संपर्क साधावा.”

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच नांदेडचे काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात झेप घेतली होती. त्याचा धक्का पुरेसा बसायच्या आतच आता खतगावकर जोडपं देखील काँग्रेसला बाय-बाय म्हणत आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसच्या उरलेल्या नेत्यांना अजून चिंतेत टाकलं आहे.

BJP : भंडारी भाऊंची विधानपरिषद एक्सप्रेस हुकली

गळतीची सिरीज 

राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्याआधीच महाविकास आघाडीचे नेते ‘स्वराज्याच्या’ शोधात इतर पक्षांत स्थायिक होत आहेत, हे विशेष. त्यामुळे काँग्रेससाठी ही धक्का बसण्याची सिरीज थांबायचं नाव घेत नाही.

नांदेड जिल्ह्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं वर्चस्व वाढणार हे नक्कीच. काँग्रेसच्या उरलेल्या नेत्यांना ‘मागे वळून बघण्याऐवजी थेट गूगल मॅपवर स्वतःचं पुढचं राजकीय ठिकाण शोधायला हवं,’ असं म्हटल्यास चुकीचे होणार नाही. थोडक्यात, महाविकास आघाडीतील ‘नजर चुकली की नेता पळाला’ ही सध्याची स्थिती आहे. आता पाहायचं, पुढचं कोणत्या नेत्याचं सामान बांधलं जातंय ते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!