महाराष्ट्र

Snehal Ramteke : चंद्रपूरच्या शहर अध्यक्षपदी वंचितांचा नवा चेहरा

Chandrapur : आगामी महानगरपालिकेत ठसा उमटण्याची तयारी

Author

चंद्रपूर शहरात वंचित बहुजन आघाडीने संघटन बळकटीसाठी माजी नगरसेवक स्नेहल रामटेके यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा उत्साह वाढताना दिसतो आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर प्रत्येक पक्षाने रणधुमाळी अधिकच वाढवली आहे. राज्यात अनेक पक्ष आपापली मोर्चेबांधणी जोरदार सुरू करत आहेत. अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीला (VBA) नव्या ऊर्जा आणि दिशा देण्याचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. अलीकडेच वंचित बहुजन आघाडीने चंद्रपूर शहरासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे.

बाबूपेठ प्रभागाचे माजी नगरसेवक स्नेहल देवानंद रामटेके यांना चंद्रपूर शहर अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पक्षाला स्थानिक स्तरावर बळकट होण्याची मोठी संधी मिळाली आहे. स्नेहल रामटेके हे राजकारण आणि समाजसेवेतील अनुभवी व समर्पित कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षांपासून ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. मागील महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणूनही लढत मोठ्या मतांनी विजय मिळवून आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.

Indian Politics : बुद्धिबळाची अनपेक्षित चाल; उपराष्ट्रपतीपदावर बसणार कोण?

प्रभाग पातळीवर भेटीगाठी

स्नेहल रामटेके या अनुभवाने आणि जनतेशी असलेल्या जवळीकामुळे चंद्रपूर शहरात त्यांचा व्यापक जनाधार आहे. त्यांची नेतृत्वक्षमता आणि दूरदर्शी धोरणे वंचित बहुजन आघाडीला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा विश्वास पक्ष नेतृत्वास आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही स्नेहल रामटेके यांच्या नियुक्तीवर समाधान व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचण्याचा आणि सामाजिक चळवळींना गती देण्याचा मोठा आधार मिळेल.

चंद्रपूरमध्ये विद्यमान असंतोष आणि जनतेच्या गरजा लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडी आता एक ठोस आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून उभे राहू शकते, अशी राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे की स्नेहल रामटेके यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आगामी महानगरपालिका निवडणुकीत मोठा ठसा उमटवेल. स्नेहल रामटेके लवकरच शहरातील विविध प्रभागांमध्ये भेट देऊन थेट जनतेच्या समस्या जाणून घेतील आणि संघटनेला अधिक मजबूत बनवतील. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभावी कामगिरीची आशा आहे.

Vijay Wadettiwar : निवडणूक आयोगाला का लागतो भाजपचा शेल्टर?

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!