महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : लोकशाहीवर ‘दादा’गिरी नाही चालणार

Congress : मराठा - ओबीसी वादात महायुतीचा जीआर स्क्रिप्टेड ड्रामा

Post View : 27

Author

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महिला आयपीएस अधिकाऱ्याशी झालेल्या व्हिडीओ कॉलमधील दमदाटीवरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या नाट्याचा नवा अंक रंगतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे ढोल वाजत असताना, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याने वातावरण चांगलंच तापलंय. या सगळ्या गदारोळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘दादा’ शैलीने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधलंय. त्यांची थेट, आक्रमक आणि कधी कधी बिनधास्त बोलण्याची शैली नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी हाच अंदाज त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरतोय. माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खननाच्या कारवाईसाठी गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांचा तिथल्या ग्रामस्थांशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी खडाजंगी झाली.

एका कार्यकर्त्याने यातच थेट अजित पवारांना फोन लावला आणि मग काय, व्हिडीओ कॉलवर पवारांनी अंजली यांच्याशी संवाद साधला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यातून अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप होतोय. या सगळ्या प्रकरणाने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून अजित पवारांना चांगलंच सुनावलंय. चोरीचे काम, चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई करणे हे पोलिसांचे काम आहे. सत्ता ही जनतेची सेवा करण्यासाठी आहे.

Sudhakar Kohale : विधानसभा गेली, आता पदवीधर मतदारसंघात मारणार बाजी?

फडणवीसांची चतुराई उघड

दुसऱ्यांवर दादागिरी करण्यासाठी नाही. पण यांना सत्तेचा माज चढलाय आणि तो ओसंडून वाहतोय, असा घणाघाती हल्ला वडेट्टीवारांनी चढवला. अजित पवारांच्या त्या व्हायरल व्हिडीओवर टीका करताना ते म्हणाले, सत्ता ही मालकी हक्काची वस्तू नाही. पण महायुतीच्या सरकारला ती तशीच वाटतेय. करमाळ्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करणे हे लोकशाहीला शोभत नाही. यांना वाटतंय, आम्ही जे मनात येईल ते करू. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानेही वातावरण ढवळून निघाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने मराठा आरक्षणाचा शासन निर्णय जाहीर केला, पण यामुळे ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झालाय.

ओबीसी नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा सरसकट जीआर नाही, फक्त पुराव्याचा आदेश आहे, यामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही, असे सांगितले. पण वडेट्टीवार यांनी यावरही मिश्किल टिप्पणी केली. मुख्यमंत्री फार चतुराईने खेळतायत. हा जीआर म्हणजे काहीच अर्थ न लागणारा कागदाचा तुकडा आहे. एकाला मारल्यासारखे, दुसऱ्याला रडल्यासारखे, एकाला हसल्यासारखे आणि दुसऱ्याला अश्रू पुसल्यासारखे असे स्क्रिप्टेड नाटक सध्या महाराष्ट्रात रंगतंय असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं कसं घडतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Maratha Reservation Controversy : कुणबी प्रमाणपत्राचे दार होणार बंद?

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर मोहनकर | Shankar Mohankar

शंकर यांनी नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. 2023-24 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी द लोकहित लाइव्ह येथे आपल्या करीअरला सुरुवात केली.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!