महाराष्ट्र

Assembly elections : साहेबान मेहरबान कदरदान… जवळ आलाय मतदान

Maharashtra : विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत महायुतीचा विजय

Post View : 19

Author

महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे, कारण विरोधी पक्ष निवडणुकीत उतरलेले नाही. 27 मार्चला मतदान होणार असून, 20 मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

विधान परिषदेसाठी पाच रिक्त जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. 27 मार्च रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १७ मार्च रोजी पूर्ण झाली आहे. एकूण सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, मात्र मंगळवारी झालेल्या चाचणीदरम्यान एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला.

निवडणुकीच्या या रणांगणात आहे, भाजपचे संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे. शिवसेनेकडून आहेत चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला, कारण आहे त्यांच्याकडे आवश्यक असलेले आमदारांच्या समर्थनाची पत्रे आणि नोटरी, जी त्यांच्याकडे नव्हती.

Uddhav Thackeray : होय, तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबीनमध्ये होते

विरोधकांची सदस्यसंख्या कमी 

अर्ज मागे घेण्यासाठी 20 मार्चपर्यंत वेळ देण्यात आली आहे. जर कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही, तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून 20 मार्चनंतर विनविरोध निवडणुकीची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. विरोधी पक्ष महाविकास आघाडीने या निवडणुकीत कोणताही उमेदवार दिलेला नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे विधानसभेतील त्यांच्या आमदारांची संख्या तुलनेने कमी आहे. पराभव निश्चित असल्याने त्यांनी निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप आणि त्याच्या सहयोगी पक्षांच्या उमेदवारांचा विनविरोध विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्यसंख्या 78 आहे. विधानसभेप्रमाणे ती पाच वर्षांनी विसर्जित होत नाही, तर सदस्य सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतात. यापैकी 30 सदस्यांची निवड विधानसभेतील आमदारांकडून होते, तर 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडले जातात. शिक्षक व पदवीधर मतदारसंघांतून प्रत्येकी सात सदस्य निवडले जातात. सोबतच राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील 12 सदस्यांची निवड करतात.

निवडणुकीची प्रक्रिया 

विधानसभा निवडणुकीसारखी थेट निवडणूक विधान परिषदेत होत नाही. इथे राष्ट्रपती किंवा सिनेट निवडणुकीसारखी पसंतीक्रमाधारित मतदान प्रक्रिया अवलंबली जाते. निवडणूक आयोग मतदार आणि उमेदवार यांच्यानुसार एक निश्चित कोटा ठरवतो. पहिल्या पसंतीचे मत कोट्याएवढे नसल्यास दुसऱ्या पसंतीच्या मतांद्वारे विजेता ठरतो.निवडणुकीत गुप्त मतदान होणार असल्याने पक्षनिष्ठा डळमळीत होण्याची शक्यता असते. राज्यसभा निवडणुकीत जसे मोकळे मतदान असते, तसे विधान परिषदेत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विरोधी पक्ष निवडणुकीत न उतरल्याने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांसाठी निवडणुकीचा मार्ग सुकर झाला आहे. आता सर्वांच्या नजरा 20 मार्चच्या अंतिम तारखेकडे लागल्या आहेत. जर सर्व उमेदवारांची उमेदवारी कायम राहिली आणि निवडणूक झाली, तर मतदान 27 मार्च रोजी पार पडेल. अन्यथा, महाराष्ट्र विधान परिषदेसाठी विनविरोध निवडणूक जाहीर होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!