महाराष्ट्र

Yashomati Thakur : पत्ते खेळणारे चालतात, पण चार पत्ते अंगावर येताच मारहाण करतात 

Congress : ठाकूर यांचा सत्ता महालाला शब्दांचा वज्रप्रहार 

Author

सभागृहात कृषिमंत्री मोबाईलवर रमी खेळताना आढळले आणि राज्यभर संतापाची लाट उसळली. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती शब्दांची रमीच मांडली.

राजकारणाचा रंगमंच आता ‘पत्त्यांच्या’ जुगारात बदलला आहे का? सभागृहात मंत्री रमी खेळतात आणि रस्त्यावर कार्यकर्ते लाथा-बुक्क्यांनी उत्तर देतात. हे दृश्य पाहून लोकशाहीची लक्तरं वेशीला टांगली जात आहेत, असं म्हणायला हरकत नाही. असा शब्दांत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या संपूर्ण राज्याच्या संतप्त मनात एकच सवाल गूंजतोय. शेतकरी मृत्यूच्या उंबरठ्यावर आणि मंत्री ऑनलाईन गेमच्या नशेत?

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला. त्या एका दृश्याने जनतेच्या विश्वासाला तडा गेला आणि विरोधकांच्या संतापात पेट भरला. विरोधकांनी सरकारला उद्देशून सवाल उभे केले, की जेव्हा कृषिमंत्रीच पत्त्यांमध्ये अडकले असतील, तेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार?

Vijay Wadettiwar : महायुती सरकारला प्रश्न विचारल्यास लाथा बुक्क्यांचे उत्तर मिळते 

लोकशाहीला धोका

आगीवर तेल ओतल्यासारखा प्रसंग लातूरमध्ये घडला. जिथे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत असताना छावा संघटनेचे संतप्त कार्यकर्ते थेट त्यांच्यावर पत्ते फेकत राग व्यक्त करू लागले. हा लोकशाही मार्गाने केलेला विरोध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सहन झाला नाही आणि पाहता पाहता सभागृहात सुरू झालेला रमीचा खेळ, परिषदेत घुसून बेदम मारहाणीच्या खेळात परिवर्तित झाला.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी एकट्याच महायुती सरकारवर हल्लाबोल करत एकाच वेळी सत्तेचा मुखवटा फाडला. त्या म्हणाल्या, विधानसभेत पत्ते खेळणारे सहकारी चालतात, पण त्याच पत्त्यांचे प्रतीक म्हणून कार्यकर्त्यांनी चार पत्ते फेकले तर संताप व्यक्त केला जातो, हा न्याय आहे का? शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर असताना, मंत्री मजेत गेम खेळतात आणि विरोध करणाऱ्यांना मारहाण होते. हे सरकार जनतेच्या प्रश्नांपासून दूर जाऊन स्वतःचं अस्तित्व ‘पत्त्यांच्या महालात’ शोधत आहे, अशी आगपाखड त्यांनी केली.

Nagpur : शालार्थ घोटाळ्याला चपराक; शिक्षण खात्याची नवी शिस्त लागू

राज्यात संतापाची लाट

ठाकूर यांचा रोख एकदम स्पष्ट होता की, ही केवळ एक चूक नाही, तर ही सत्तेच्या अहंकाराची परिणती आहे. लोकशाहीत लोकांना विरोध व्यक्त करण्याचा अधिकार असतो, त्यावर लाठ्या चालवणं म्हणजे फक्त असहिष्णुतेचा चेहरा दाखवणं, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. सध्या संपूर्ण प्रकरणावरून राज्यात संतापाची लाट आहे. जनतेतून आणि शेतकऱ्यांतून आवाज उठवला जातोय, ‘खेळ थांबवा आणि काम करा’.

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघात करत महायुती सरकारवर एकामागून एक प्रश्नांचे बाण सोडले. हे सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करतंय का?, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. विजय वडेट्टीवार म्हणाले, सत्ताधारी माजले आहेत. मंत्री अधिवेशनात पत्ते खेळतात, आणि जाब विचारला की त्यांचे कार्यकर्ते पत्रकार परिषदेत मारहाण करतात. हे सरकार आहे की गुंडांचा जमाव? कायद्याचा धाक फक्त सामान्य जनतेसाठी आहे का? मंत्र्यांसाठी, त्यांच्या संघटनांसाठी वेगळा कायदा आहे का?, असा घणाघाती सवाल त्यांनी विचारला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!