भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना ऑपरेशन सिंदूरनंतर ठरल्याने देशात संताप आणि राजकीय वाद पेटले आहेत.
देशात काही आठवड्यांपूर्वी घडलेल्या पहलगाम हल्ल्याने संपूर्ण भारत हादरले होते. काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात अनेक निर्दोष जीव हिरावले गेले. यामुळे भारत-पाकिस्तान संबंधात पुन्हा एकदा तणावाची ठिणगी पडली. पाकिस्तानकडून प्रेरित असल्याचा आरोप असलेल्या या हल्ल्याने देशभर खळबळ उडाली. भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथा पुन्हा एकदा चर्चेत आल्या. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवली. ज्यात शत्रूच्या सीमेवर धडक कारवाई करून शहीदांच्या रक्ताचा सूड घेण्यात आला. मात्र, आता या घटनेच्या पार्श्वभूमीवर एक नवीन वादंग सुरू झालं आहे. क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. 4 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आशिया चषक स्पर्धेत 14 सप्टेंबरला हा सामना रंगत आहे.
क्रिकेट हे फक्त खेळ नाही, तर राष्ट्रभावनेचं प्रतीक मानलं जाणाऱ्या भारतात, या सामन्याला विरोधाचा सूर उमटतो आहे. बीसीसीआयने या सामन्याला होकार दिला असला, तरी पैसा बोलतो आहे या न्यायाने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप होतो आहे. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तान सोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, हे शहीदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं 75 टक्के भारतीयांचं मत आहे. या मुद्द्याने राजकारणातही खळबळ उडवली आहे. विविध पक्षांकडून सरकारवर टीका होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला असून, आंदोलनेही सुरू केली आहेत. अशा पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही या मुद्द्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी बोलताना म्हणाल्या, ‘व्वा मोदीजी व्वा, काय देशभक्ती आहे तुमची?
बीसीसीआय निर्णय वादग्रस्त
एकीकडे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे म्हणता आणि दुसरीकडे दुबईत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला तयार आहात. त्यांनी जय शहा आणि अनुराग ठाकूर यांच्यावरही टीका केली, की ते पाकिस्तानी क्रिकेटशी बसून बोलतात, जे पटण्यासारखं नाही. शहीदांच्या कुटुंबीयांचा विचार करा, त्यांच्या बलिदानाचा तरी आदर करा, असं त्या म्हणाल्या. दरवेळी व्यापाऱ्यांचा विचार कराल का? या वादंगाने क्रिकेट आणि राजकारण यांचा मेळ कसा घालायचा, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे सैनिक सीमेवर लढत असताना, दुसरीकडे क्रिकेटच्या मैदानावर हातमिळवणी करणे, हे कितपत योग्य? इतिहासात भारताने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला आहे. जसे की 2008 मुंबई हल्ल्यानंतर. मात्र, आता बीसीसीआयच्या निर्णयाने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
यशोमती ठाकूर यांनी यावर बोलताना म्हणाल्या, काहीतरी कणखर भूमिका घेतली पाहिजे. याच्या आधी आपल्या देशाने पाकिस्तानसोबत खेळायला नकार दिला आहे. आज तुम्ही तुमच्या पाठीचा कणा मोडल्यासारखे का वागताय? या सामन्याच्या विरोधात जनतेचा रोष वाढतो आहे. सोशल मीडियावर #BoycottIndoPakMatch असा ट्रेंड सुरू झाला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक यात सामील होत आहेत. क्रिकेट हे मनोरंजन आहे, पण जेव्हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो, तेव्हा पैसा आणि व्यावसायिक हितसंबंध बाजूला ठेवले पाहिजेत, असं मत अनेकांचं आहे. यशोमती ठाकूर यांनी यावर बोलताना सैनिकांच्या स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित केला. एकीकडं युद्ध करायचं, दुसरीकडे सिंदूर सुरू आहे म्हणायचं आणि तिसरीकडे नतमस्तक व्हायचं.
व्यापाऱ्यांच्या हिशोबाने चालेल तर कसं होईल? असं त्या म्हणाल्या. या प्रकरणाने सरकारसमोर एक आव्हान उभं राहिलं आहे. बीसीसीआय ही स्वायत्त संस्था असली तरी, तिचे निर्णय राष्ट्रहिताशी जोडलेले असतात. यामुळे राजकीय रंगही या वादाला येतो आहे.