महाराष्ट्र

Yavatmal : ठाकरे बंधू एकत्र, पण संजय राठोडांच्या खेळीने ‘मशाल’ मावळतीकडे

Shiv Sena : एकनाथ शिंदे गटाकडे वळतेय यवतमाळची राजकीय हवा

Author

संजय राठोड यांच्या पुढाकाराने यवतमाळमधील उबाठा गट, काँग्रेससह अनेक प्रमुख नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अनेक आश्चर्यकारक वळणे पाहायला मिळत आहेत. हिंदी-मराठी भाषावादाच्या तणावाखाली ठाकरे बंधूंच्या अचानक झालेलय युतीने राज्याच्या राजकारणात नव्या इतिहासाची नोंद झाली आहे. 5 जुलै 2025 रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोन दशकांनंतर एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर आपली छाप सोडली. या युतीमुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय धर्ती तयार झाली, ज्याचा प्रभाव लगेचच जाणवू लागला. परंतु या युतीच्या नंतरही उद्धव ठाकरे गटामध्ये काही गळती सुरूच आहे.

अनेक नेते आणि कार्यकर्ते मशाल सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी या पार्श्वभूमीवर मुंबईत एक महत्वाचा राजकीय उपक्रम राबवला. यवतमाळ जिल्ह्याचे प्रमुख नेते संजय राठोड यांनी मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षांतील वरिष्ठ आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत सामावून घेतले. या पक्षप्रवेश सोहळ्याने यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर मोठा बदल घडवून आणला आहे. विशेष म्हणजे उबाठा गट आणि काँग्रेससह इतर पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते या निमित्ताने शिवसेनेच्या ताब्यात आले आहेत.

Devendra Fadnavis : बेशिस्त मंत्र्यांचे देवभाऊ झाले डिसिप्लिन मास्टर

विदर्भातील राजकीय हालचाल

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संजय राठोडांच्या नेतृत्वाखाली हे वळण यवतमाळच्या राजकीय समीकरणांमध्ये नवा ताण आणेल, अशी चर्चा आहे. या सोहळ्याला पश्चिम विदर्भाचे नवनियुक्त प्रभारी विभागीय समन्वयक पराग पिंगळे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगणवार आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारीही उपस्थित होते. या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये उबाठा गटाचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, माजी नगराध्यक्षा सुनीता जयस्वाल, तसेच काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोकेश इंगोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले.

शिवाय विविध पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी देखील या राजकीय संक्रमणाचा भाग ठरले. संजय राठोड यांनी पश्चिम विदर्भातील ठाकरे गटातील नेत्यांना शिवसेनेच्या पक्षात आणण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे. या प्रयत्नामुळे ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत सामील होऊन पक्षाची ताकद वाढवित आहेत. राजकारणाच्या या नव्या खेळात संजय राठोड यांचे नेतृत्व आणि पुढाकार याला मोठा मान मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्याचा हा मोठा राजनीतिक घडामोडींचा टप्पा आता महाराष्ट्राच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करणार असल्याचे वर्तुळात सांगितले जात आहे.

Nagpur : न्यायालयाच्या ठशामुळे खुलं झालं प्रगतीचं द्वार 

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!