आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा थाटात पार पडला.
राजकारण हे केवळ सत्तेसाठी नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रभावी माध्यम आहे, हे सिद्ध करत आमदार संजय खोडके यांनी अमरावतीत युवांना जबाबदारीचे व नेतृत्वाचे पाठ शिकविला आहे. अमरावतीच्या संत गाडगे बाबा समाधी प्रांगणात पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या नियुक्ती व पदग्रहण सोहळ्यात त्यांनी स्पष्ट केले की, युवकांनी केवळ निष्क्रिय प्रेक्षक न राहता राष्ट्रनिर्मितीच्या प्रगल्भ प्रक्रियेत सक्रिय भाग घ्यावा. कार्यक्रमात नवनियुक्त शहर अध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या कार्यकारिणीत 9 उपाध्यक्ष, 17 सरचिटणीस आणि 42 सचिवांचा भव्य समावेश करण्यात आला.
अमरावतीतील यामुळे युवकांसाठी नवीन राजकीय संधींचे दरवाजे खुले झाले आहे. ही नवी टीम शहरात विधायक बदल घडवण्यासाठी सज्ज झाली आहे.प्रदेश महासचिव संजय खोडके यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, युवक हा केवळ देशाचा नाही, तर प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीचा कणा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली युवकांसाठी धोरणात्मक पातळीवर निर्णय घेतले जात आहे. उद्योग व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अमरावतीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर युवांसाठी प्रशिक्षण, नेतृत्व विकास आणि स्वयंनिर्भरतेच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.
Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भाला ऐतिहासिक भेट
सकारात्मक नेतृत्वाची गरज
खोडके यांनी युवांना आवाहन केले की, समाज बदलू पाहतोय. पण त्यासाठी दिशा आणि संघटनात्मक प्रयत्नांची गरज आहे. हेच कार्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस करत आहे. त्यामुळे प्रत्येक युवकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवत सामाजिक आणि राजकीय बदलाची मशाल आपल्या खांद्यावर घ्यावी. कार्यक्रमात आमदार सुलभा खोडके यांनी देखील युवकांना प्रेरणादायी विचार दिले. पद म्हणजे प्रतिष्ठा नव्हे, ती जबाबदारी असते. समाज तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना राष्ट्रवादी विचारांचा अभिमान ठेवावा, असे त्या म्हणाल्या.
अजित पवारांचे 15 तासांचे कार्यशैलीचे उदाहरण देत त्यांनी युवकांना प्रेरणादायी राजकारणाचा आदर्श दिला. ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वाखाली घोषित झालेल्या कार्यकारिणीत मनीष पाटील, जयेश सोनोने, प्रथमेश गवई (उपाध्यक्ष), प्रतीक डुकरे, सुजल तेलखडे (सरचिटणीस), उज्वल पांडे, सौरभ विघे (सचिव) यांच्यासह विविध सेल प्रमुख व युवा नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, क्रीडा, आरोग्य आणि सांस्कृतिक सेलप्रमुखांची स्वतंत्र नेमणूक करण्यात आल्यामुळे सर्व समाजघटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित झाले आहे. कार्यक्रमाला यश खोडके, प्रशांत डवरे, ऍड. किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, आकाश हिवसे, अभिषेक हजारे, संकेत बोके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Devendra Fadnavis : अफाट डिजिटल युगात, वाहणार फास्ट महसूल सेवा