नुकताच काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारवर टीका करत ठोस कारवाईचा सवाल उपस्थित केला आहे.
दक्षिण काश्मीरमधील निसर्गरम्य अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित झाला आहे. बैसरण खोऱ्यात 22 एप्रिल रोजी दुपारी घडलेल्या गोळीबारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात माओवाद्यांनी अंदाजाने आणि धर्म ओळखून गोळ्या झाडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत या भ्याड हल्ल्यात 27 निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, काही पर्यटक अजूनही घटनास्थळी अडकले आहेत. घटनेनंतर देशात आणि राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला आहे.
काही नेत्यांनी या हल्ल्याचा उपयोग भावनात्मक आरोप-प्रत्यारोपासाठी केला असून, सोशल मीडियावर याचे पडसाद जोरात उमटत आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी रोष व्यक्त करत म्हटले, 56 इंचाचे सरकार केवळ घोषणाबाजी करत आहे. एकदाच ठोस कारवाई करा आणि मग गुणगान करा. जनता केवळ फोटो आणि भाषणांवर विश्वास ठेवत नाही. ते पुढे म्हणाले, माओवाद्यांविरोधात भारताने कुठला ठोस उपाय योजला आहे? केवळ कारवाईची नाटके पुरेशी नाहीत. या संपूर्ण हल्ल्यात देशाच्या सुरक्षा यंत्रणांची कुचकामी भूमिका अधोरेखित झाली आहे. पहलगाम हल्ला हे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे अपयश आहे. असा थेट आरोप करण्यात आला आहे.
अग्निवीर योजनेवर टीका
अग्निवीर योजना हा देखील एक अपयशी प्रयोग ठरल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे. नियमित सैन्य भरती थांबवून देशाची सुरक्षा धोक्यात टाकण्यात आली आहे, असा आक्रोश आहे. गृहमंत्री आणि पंतप्रधान या घटनेबाबत पूर्णतः अपयशी ठरले आहेत, अशी देखील टीका झाली. हे सरकार देवळातल आहे, देशाच्या सुरक्षेचं सरकार नाही, असा घणाघात करण्यात आला आहे. या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात काही निर्णायक निर्णय घेतले आहेत. अटारी-वाघा सीमेच्या बंदीपासून ते पाकिस्तानच्या नागरिकांना मिळणाऱ्या SAARC व्हिसा रद्द करण्यापर्यंत अनेक कठोर पावले उचलण्यात आली आहेत.
पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातील संरक्षण विषयक कर्मचारीही परत बोलावण्यात आले आहेत. हल्ल्यानंतर काही माध्यमांद्वारे धर्म ओळखून हल्ला झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, याचा उपयोग धर्माधारित राजकारणासाठी होऊ नये, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. ज्यांना गोळ्या घालण्यात आल्या ते हिंदू किंवा मुस्लिम नसून भारतीय होते. देशाचे नागरिक होते. त्यांचा मृत्यू धर्माशी जोडणे ही अत्यंत चुकीची बाब आहे, असा जोरदार निषेध आंबेडकर यांनी व्यक्त केला. हल्ल्याने देश हादरला असतानाच, नागरिक केंद्र सरकारकडून अधिक कडक आणि ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा करत आहेत.
